नगर : वाहतुक पोलिस निरीक्षकाला रिक्षाचालकाकडून धक्काबुक्की

नगर : पोलीसनामा ऑनलाईन
रस्त्यामध्ये उभी केलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन शिर्डी वाहतुक पोलीस निरीक्षकांना धक्काबुक्की करण्यात आली. हा प्रकार शिर्डी – कोपरगाव रस्त्यावरील एका हॉटेलसमोर दुपारी साडेचारच्या सुमारास घडला. याप्रकरणी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d153cee9-a48b-11e8-b2f2-336a406351d0′]
गोकुळ औताडे असे धक्काबुक्की करण्यात आलेल्या वाहतुक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. तर विक्रम मुरलीधर दुफळे (रा. कोकमठाण, ता. कोपरगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
दुफळे यांनी त्याची रिक्षा रस्त्यात आडवी उभी केली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तेथे उपस्थित असलेले पोलिस निरीक्षक औताडे यांनी चालकास रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. त्याचा राग आला व त्याने औताडे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. याप्रकरणी रिक्षाचालक विक्रम दुफळे याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या चक्री उपोषणाला सुरुवात
जनता दल ते भाजप संगीता खोत यांचा राजकीय प्रवास
पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला दोनशे रुपयांची लाच घेताना पकडले