Nagar Urban Co-Op Bank | रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेवर घातले निर्बंध; खातेदारांना केवळ 10 हजार रुपये काढता येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर येथील नगर अर्बन को-ऑ प बँक लिमिटेडची (Nagar Urban Co-Op Bank) आर्थिक परिस्थिती ढासळत चालली आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अर्बन बँकेवर निर्बंध (Nagar Urban Co-Op Bank) घातले आहेत. या निर्बंधामुळे आता ग्राहकांना खात्यातून केवळ १० हजार रुपयेच काढता येतील. त्यापेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.

 

बँकिंग नियमन अधिनियम १९४९ अंतर्गत ६ डिसेंबर २०२१ पासून पुढील सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू असतील. तसंच याची समीक्षाही केली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्याने आता कोणालाही कर्ज द्यायचे असल्यास किंवा अँडव्हान्स देण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. इतकच नाही तर कर्जाचे नूतनीकरण, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक, देवाणघेवाण, संपत्तीचं हस्तांतरण किंवा विक्रीदेखील करता येणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हंटले आहे.

 

१० हजारच काढता येणार

रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधाची माहिती ग्राहकांना मिळावी यासाठी बँकेच्या परिसरात आदेशाची प्रत लावली आहे. खातेधारकांना खात्यातून केवळ १० हजार रुपये काढता येणार आहे. बँकेवर घातलेल्या निर्बंधांचा अर्थ बँकेचा लायसन्स रद्द करणं असा होत नसल्याचेही या आदेशात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

 

Web Title :- Nagar Urban Co-Op Bank | rbi restriction maharashtras nagar urban co op bank customer withdrawals only 10k rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा