अहमदनगर : विजेची तार अंगावर पडून महिलेचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत तालुक्यातील उंबराचे लवण येथे उच्च दाबाची विद्युत वाहिनी अंगावर पडून महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. सुरेखा अनिल ननवरे हे महिलेचे नाव आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, वीज वितरण अधिकारी कुलकर्णी घटनास्थळी पोहोचले. सुरेखा ननवरे त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्या मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह होत्या. त्या कुटुंबातील कर्त्या व्यक्ती होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

विद्युत वाहिनी अनेक वर्षांपासून जीर्ण झाल्या आहेत. दुरुस्ती करण्यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. मात्र, वीज वितरण कंपनीने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे सुरेखा ननवरे त्याचा नाहक बळी गेला आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/