Nagaur weird case | ‘हा’ व्यक्ती वर्षातील 300 दिवस झोपतो, झोपेतच जेवतो; दुर्मिळ आजाराने पीडित

जयपुर : Nagaur weird case | राजस्थानच्या नागौरमध्ये एक व्यक्ती दुर्मिळ आजाराने (Rare Disease) पीडित असल्याचे प्रकरण समोर आले आहे. येथील भादवा (Nagaur weird case) गावातील एक रहिवाशी वर्षातील सुमारे 300 दिवस झोपतो. त्याचे नाव पुरखाराम असून त्यास एकदा झोपल्यानंतर उठणे अवघड होते. घरातील लोक झोपेतच त्यास जेवण खाऊ घालतात. पुरखाराम म्हणतो त्यास इतर कोणताही त्रास नाही, केवळ झोपच झोप येते. त्याला जागे व्हायचे असते पण शरीर साथ देत नाही.
स्थानिक लोक म्हणतात कुंभकर्ण
पुरखारामचे वय 42 वर्ष आहे. या दुर्मिळ आजारामुळे तो अनेक दिवस लागोपाठ झोपून राहतो. पुरखारामच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, तो एकदा झोपला की अनेक दिवस झोपून राहतो, 20 ते 25 दिवसापर्यंत न उठणे त्याच्यासाठी सामान्य बाब आहे. अशावेळी एखादे महत्वाचे काम आले तर मोठी अडचण येते, कारण अशावेळी पुरखारामला उठवणे कुटुंबियांसाठी व अवघड जाते. शेजारील गावांपासून आजूबाजूच्या परिसरात पुखरामला लोक कुंभकर्ण म्हणतात.
पुरखाराम 18 वर्षाच्या असताना त्याला हा आजार झाला. सुरुवातीला तो 5 ते 7 दिवसापर्यंत झोपायचा. तेव्हा डॉक्टरांनासुद्धा दाखवले परंतु या आजारावर उपाय सापडला नाही.
हळुहळु पुखरामच्या झोपेची वेळ वाढत गेली. पुखराम दुर्मिळ हायपरसोम्निया (Hypersomnia)
आजाराने पीडित असल्याचे डॉक्टर सांगतात. वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की, त्याने योग्य उपचार घेतले
तर तो बरा होऊ शकतो. पण कुटुंबियांना वाटत नाही की तो कधी बरा होईल. पुरखारामची पत्नी
लिछमी देवी म्हणते आमचे गावात एक दुकान आहे पण ते नेहमी बंद राहते, ते दुकानात काम करता-
करता झोपून जातात. तर पुखरामची वृद्ध आई म्हणते, सध्या शेतीवर गुजराण होत आहे, पण पुढे
काय होणार ही चिंता आहे.
Indore police | इंदूर पोलिसांची वेबसाईट हॅक; बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याने शहरात रेड अलर्ट
Chandrapur News | बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार; घरात शिरुन महिलेवर केला हल्ला