कारपेट दुकानाला भीषण आग

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पारशा खुंट येथे रामपुरवाला कार्पेट दुकानाला आज भीषण आग लागली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.

शॉक सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. रामपूरवाला दुकानांमध्ये कापसाच्या गाड्या कार्पेट असल्याने आग तिथेच धुमसत राहिली. त्यामुळे दुकानांमध्ये धूर मोठ्या प्रमाणात साचला होता.

रस्त्यावरील अतिक्रमणामुळे अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला. सकाळची वेळ असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी आणि काही वाहने होते. त्यामुळे ती हटवून अग्निशमन बंब घटनास्थळी चालकाने कसरत करीत पोहोचविला. काही वेळातच आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नसले तरी, शॉक सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.

Loading...
You might also like