…अन् पोलीस ठाण्यातच कर्मचार्‍यांनी केला नागिन डान्स

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात दिवाळी आनंदात साजरी केली जात असतानाच बिहार पोलिसांचा नागिन डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (nagin-dance-policemen-deepawali-night-narhat-police-station) होत आहे. दिवाळीच्या दिवशीच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. पोलीस ठाण्यात हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहार जिल्ह्यातील नवादा परिसरात ही घटना घडली आहे. दिवाळीच्या दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात नागिन डान्स करून ठुमके लगावले आहेत. पोलिसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विविध गाण्यांवर नाचताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. अधिकाऱ्यांपासून हवालदारांपर्यंत अनेकजण डान्स करत होते.

अधिकाऱ्यांनीदेखील हा व्हायरल झालेला व्हिडिओ पोलीस ठाण्यातील असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्या अनुपस्थितीत हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. गस्त घालण्यासाठी गेलेले असताना हा प्रकार घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलीस ठाण्यात अशा प्रकारे डान्स सुरू असल्याने त्यावर टीकेची झोड उठली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.