‘नागिन डान्स’मध्ये पोलिस इन्स्पेक्टर ‘मशगूल’, तिथंच दाखल झाली होती दिशा केसची FIR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिशा सामूहिक बलात्कार प्रकरणात देशभरात बेजबाबदारपणामुळे बदनाम झालेले शादनगर पोलीस स्टेशन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शादनगर पोलीस स्टेशनचे इंस्पेक्टर एका कार्यक्रमात नागिन डान्स करताना दिसले त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यातून पोलीस मुख्यालयात अटॅच करण्यात आले. हे प्रकरण तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील आहे.

तेलंगाणाचे शादनगर पोलीस ठाण्याचे इंस्पेक्टर ए. श्रीधर कुमार एका कार्यक्रमात नागिन डान्स करताना दिसले. हा व्हिडिओ त्यानंतर व्हायरल झाला. व्हिडिओची माहिती जेव्हा पोलीस आयुक्त वी सी सज्जनार यांना मिळाली तेव्हा त्यांनी हे कृत्य बेजबाबदारपणाचे आणि अनुशासनहीन मानले. पोलीस आयुक्तांनी याची दखल घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्याला पोलीस मुख्यालयाशी अटॅच करण्यात आले.

आता या व्हायरल व्हिडिओचा तपास एसपी शादनगरचे वी सुरेंदर करत आहेत. तपासाचा अहवाल आयुक्तांना पाठवण्यात येईल.

याच शादनगर पोलीस ठाण्याच्या हादीत घडलेल्या दिशा बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशाला हदरवून सोडले होते. दिशा सामूहिक बलात्कार प्रकरण नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात दाखल केले गेले होते. या घटनेत चार आरोपींना ताब्यात घेतले होते त्यानंतर त्यांचा एनकाऊंटर करण्यात आला होता. या प्रकरणातील चार आरोपींना पोलीस घटनास्थळी तपासासाठी घेऊन गेले होते, जेथे आरोपींनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयन्त केला, त्यांच्यात चकमक देखील झाली. याच चकमकीत या चारही आरोपींचा एनकाऊंटर करण्यात आला होता.