Nagnath Kottapalle Passes Away | ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (Nagnath Kottapalle Passes Away) यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षांचे होते. पंधरवड्यापूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (दि. 30) सकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी शेवटचा श्वास घेतला. कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा यांच्यासह विविध प्रकारांत डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (Nagnath Kottapalle Passes Away) यांनी मुसाफिरी केली होती.

 

डॉ. कोत्तापल्ले चिपळूण येथे झालेल्या 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. 29 मार्च 1948 रोजी नांदेडमधील मुखेड या गावी डॉक्टरांचा जन्म झाला होता. त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून मराठी वाङ्मयात एमएची पदवी संपादन केली. तसेच 1980 मध्ये त्यांनी ‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध लिहून पीएचडी संपादन केली होती.
1971 साली त्यांनी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. 1996 साली ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुखदेखील होते.
श्रीगोंदा येथे 1999 साली झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि 2005 साली जालना येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. (Nagnath Kottapalle Passes Away)

 

डॉक्टरांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रातील एक मोठा आणि कर्ता माणूस गेल्याने साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
डॉ. कोत्तापल्ले यांनी अनेक विद्यार्थी घडवले. तसेच त्यांच्या साहित्यातून आणि कवितांतून अनेक विद्यार्था घडले आणि स्फुरले आहेत.

 

Web Title :- Nagnath Kottapalle Passes Away | vateren writer nagnath kotapalle passes away at age 75

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vikram Gokhale | विक्रम गोखलेंच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; ‘सूर लागू दे’ लवकरच थिएटरमध्ये धडकणार

Sanjay Raut | ‘उदयनराजेंचे अश्रू म्हणजे महाराष्ट्राचे अश्रू’

Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर