Nagpur ACB Trap on PSI | आरोपीला अटक न करण्यासाठी 35 हजार रुपये लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी त्याच्याकडून 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना (Accepting Bribe) खापा पोलीस ठाण्यातील (Khapa Police Station) पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस शिपायाला नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nagpur ACB Trap on PSI) सापळा रचून रंगेहात पकडले. ओम कलेगुरवार Om Kalegurvar (वय 28 ह/मु अधिकारी क्वाटर खापा,खापा ता सावनेर जि नागपूर मुळ रा. चुनाभट्टि, राजुरा ता राजुरा जि चंद्रपूर), पोलीस शिपाई दिनेश गंगाधर गीरडे (Police constable Dinesh Gangadhar Geerde) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. नागपूर एसीबीने (Nagpur ACB Trap on PSI) ही कारवाई शुक्रवारी (दि.3) केली

याबाबत सावनेर तालुक्यातील खापा येथील 38 वर्षाच्या व्यक्तीने नागपूर एसीबीकडे (Nagpur ACB Trap on PSI) तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्यावर खापा पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा (FIR) दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ओम कलेगुरवार यांचेकडे आहे.या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक (Arrest) करायची नसेल आणि गुन्हयात पीसीआर घ्यायचा नसेल आणि गाडी जप्त करायची नसेल तर 40 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती कलेगुरवार आणि पलीस शिपाई दिनेश गीरडे यांनी 35 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांनी नागपूर एसीबीकडे तक्रार केली.

नागपूर एसीबीच्या पथकाने शुक्रवारी पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस शिपाई
यांनी तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 35 हजार रुपये स्वीकारण्याचे
मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना दोघांना रंगेहात पकडले. दोघांवर नागपूर ग्रामीणच्या खापा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र, नागपूर, पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर
(SP Rahul Maknikar), अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते (Addl SP Madhukar Gite)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अनामिका मिर्झापुरे (DySP Anamika Mirzapure),
पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे (Police Inspector Pravin Lakde), पोलीस निरीक्षक प्रीति शेंडे
(Police Inspector Preeti Shende), महिला पोलीस नाईक गिता चौधरी, आशू श्रीरामे, अस्मिता मेश्राम,
दिपाली, चालक सदानंद शिरसाठ यांच्या पथकाने केली.

Web Title :- Nagpur ACB Trap on PSI | Police sub-inspector along with police in anti-corruption net while taking bribe of 35 thousand rupees not to arrest the accused

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad ACB Trap | कृषी सेवा केंद्राचा मासिक हप्ता देण्यासाठी लाचेची मागणी, कृषी अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Devendra Fadnavis | आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस