Nagpur ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना स्थापत्य अभियंत्यासह तीनजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

लाखांदूर/भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – शेताची मोक्का पाहणी करुन विकास व छाणणी शुल्क पावती देणे, तसेच रेखांकन मंजुरीसाठी अंतीम शिफारस पुढे पाठवण्यासाठी 1 लाख 10 हजारांची लाच घेताना (Accepting Bribe) नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nagpur ACB Trap) लाखांदुर नगर पंचायतीमधील तिघांना रंगेहाथ पकडले. लाच घेताना पकडण्यात आलेल्या तिघांमध्ये स्थापत्य अभियंता (Civil Engineer), कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) आणि खासगी वाहन चालकाचा (Private Driver) समावेश आहे. नागपूर एसीबीने (Nagpur ACB Trap) ही कारवाई गुरुवारी (दि.16) मध्यरात्री केली.

 

स्थापत्य अभियंता गजानन मनोहर कराड Gajanan Manohar Karad (वय-28), कनिष्ठ लिपिक विजय राजेश्वर करंडेकर Vijay Rajeshwar Karandekar (वय-40) व खासगी वाहन चालक मुखरण लक्ष्मण देसाई Mukhran Laxman Desai (वय-45) असे लाच घेताना अटक (Arrest) करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. याबाबत लाखांदूर येथील शेतकऱ्याने नागपूर एसीबीकडे (Nagpur ACB Trap) प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहून तक्रार दिली.

तक्रारदार यांची लाखांदूर येथे स्वत:च्या मालकीची शेती आहे. त्यांना शेतीचे विकास व छाननी शुल्क पावती व रेखांकन मंजुरीसाठी शिफारस हवी होती. त्यांनी या कामासाठी लाखांदूर नगरपंचायतशी (Lakhandur Nagar Panchayat) संपर्क साधला. काम करुन देण्यासाठी एक लाख दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यांनी नागपूर एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. गुरुवारी रात्री तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. तिघांविरुद्ध लाखांदुर पोलीस ठाण्यात (Lakhandur Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र, नागपूर, पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर (SP Rahul Maknikar),
अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते (Addl SP Madhukar Gite)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक योगिता चाफले (DySP Yogita Chafle),
पोलीस निरीक्षक वर्षा मते (Police Inspector Varsha Mate), पोलीस निरीक्षक आशिष चौधरी (Police Inspector Ashish Chaudhary),
पोलीस अंमलदार अमोल मेंघरे, अनिल बहिरे, अस्मिता मल्लेलवार, हर्षलता भरडकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Nagpur ACB Trap | three employees of lakhandur nagar panchayat arrested while accepting bribe in bhandara

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rudraksh Mahotsav in Sehore | धक्कादायक! रुद्राक्ष महोत्सवामध्ये झालेल्या धक्काबुक्कीत बुलडाण्यातील 3 महिला बेपत्ता

Pune Crime News | पत्नीचा गळा दाबून खून करुन पतीने विष प्राशन करुन केला आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime News | अभ्यास करताना मोबाईल पाहतो, म्हणून रागविल्याने १२ वीतील मुलाने आईचा गळा दाबून केला खून, पुण्यातील घटना