नाना पटोलेंना माझा आशिर्वाद : नितीन गडकरी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकांमध्ये जागांच्या उमेदवारीवर सर्वत्र चर्चा आहेत. त्यात नागपूर लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार आहेत. तसंच त्यांच्या समोर काँग्रेसचे नाना पटोले हे असणार आहेत. त्यामुळे एकेकाळी चांगले संबंध असलेले दोन नेते विरोधात उभे राहणार आहेत. त्यावरून नितीन गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकरांशी बोलत होते.

नाना पटोलेंच्या उमेदवारीवर गडकरींनी सगळ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, मग कोणीही उमेदवार असेल. मी कोणावरही वैयक्तिक टीका-टिप्पणी करणार नाही. काँग्रेसला आपला उमेदवार ठरवण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे. जो उमेदवार असेल त्याने लढावं, असं त्यांनी म्हटलं.

नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून आशीर्वाद संपत नाही. मी राजकारणात अशाप्रकारची दुश्मनी कधी ठेवली नाही आणि ठेवतही नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असंही नितीन गडकरींनी सांगितलं.

तसंच कोणीही समोर असले तरी, मी पाच वर्षात नागपूरात काय काम केले आहे, ते तेथील लोकांना माहित आहे. त्यामुळे मी जे पाच वर्षात काम केलं, त्याच्याच आधारावर लोकांसमोर जाऊन त्यांचा आशीर्वाद मागेलं, असंही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने २१ उमेदवरांती यादी काल जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील ५ उमेदवारांची नावे आहेत. त्यात नागपूरात नाना पटोले हे असणार आहेत त्यामुळे तेथून नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी लढत रंगणार आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

भारिप बहुजन वंचित आघाडीत विलीन करणार ; काय असेल पुढील रणनीती ?

‘ मोदी कमजोर असून चीनला घाबरतात ‘

उत्सुक नसलेल्या ‘या’ उमेदवारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा काँग्रेसचा घाट

‘ मी अजूनही निवडणुकीच्या रिंगणात , उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा लढणार ‘

#Loksabha : उदयनराजेंच्या विरोधात तृतीयपंथीय उमेदवार