‘ऑन द स्पॉट’ बदला ! बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाचा लहान भावाकडून चाकूने सपासप वार करून खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – घरात घुसून विवाहित बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाचा लहान भावाने त्याच्याच चाकुने त्याच्यावर सपासप वार करून खून केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये घडली आहे. गुंडाचा खून केल्यानंतर विवाहित महिलेच्या लहान भावाने कळमना पोलीस ठाण्यात आत्मसर्पण करू पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल असा थरार नागपूरच्या मिनिमाता नगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री घडला.

रोशन नावाच्या गुंडाने राजा भारती याच्या विवाहित बहिणीची घरात घुसून छेड काढली होती. छेड काढल्यानंतर रोशन परिसरातच फिरत होता. तो मिनिमाता नगर परिसरताच घुटमळत होता. काही वेळाने गुरु घासीदास गुरुद्वारा परिसरात राजा भारती आणि रोशन यांच्यात वाद झाले. या वादातून रोशन याने राजावर चाकूने हल्ला केला. त्यावेळी दोघांच्या झटापटीत राजाने रोशनच्या हातून चाकू घेऊन त्याच्यावर वार करून खून केला.

मंदिराच्या आवारातच हा थररा घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गुंड रोशन याचा खून केल्यानंतर राजा भारती पळून गेला नाही. तर त्याने कळमना पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. बहिणीच्या अब्रुसाठी आपल्या हातून खून झाल्याचे त्याने पोलिसांसमोर कबुल केले. पोलिसांनी राजा भारती याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास कळमना पोलीस करीत आहेत.