Nagpur Central Jail | कारागृहातच कैद्याचा मृत्यू; तुरुंग रक्षकाने मारहाण केल्याचा कैद्यांचा आरोप

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मोक्का गुन्ह्यातील (MCOCA) Mokka कैद्याचा नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) मृत्यू झाल्याची (Prisoner Death) माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून, कैद्यांनी गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही कैद्यांनी तुरुंग (Beaten) रक्षकाने मारहाण (Prison Guard) केल्यामुळे कैद्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत तुरुंग अधिकाऱ्याला (Nagpur Central Jail) घेराव घातल्याची माहिती आहे.

 

सौरभ तायवाडे (वय 24, रा. पाचपावली) असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे. तो पाचपावली पोलीस ठाण्यातील (Pachpavali Police Station) मोक्का गुन्ह्यातील आरोपी आहे. शुक्रवारी सकाळी त्याच्या छातीत दुखत असल्याची माहिती त्याने तुरुंग रक्षकाला दिली होती, परंतु तरुंग रक्षकाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर जेवणाच्या रांगेत उभे असताना त्याने प्रकृतीबाबत तुरुंग रक्षकाला सांगितले. मात्र, रक्षकाने त्याच्या कानशिलात लगावल्याने तो खाली पडला आणि त्याची प्रकृती जास्तच खालावली. त्याला मेडिकलमध्ये नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. कैद्याच्या मृत्यूचे वृत्त कारागृहातील इतर कैद्यांना समजताच 70 ते 80 कैद्यांनी याबाबत संताप व्यक्त करत तुरुंग अधिकारी कुमरे (Kumre) यांना घेराव घातला. (Nagpur Central Jail)

तसेच तुरुंग रक्षकाने मारहाण करून वेळेवर दखल न घेतल्याने सौरभचा मृत्यू झाल्याचा आरोप कैद्यांनी केला.
तसेच जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्य़ंत बराकीत जाणार नसल्याचा पवित्रा कैद्यांनी घेतला.
त्यानंतर तुरुंग अधिकारी कुमरे यांनी धंतोली पोलीस ठाण्याला (Dhantoli Police Station) याबाबत माहिती दिल्यावर पोलिसांचा ताफा कारागृहात दाखल झाला.
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कैदी आपल्या बराकीत गेले.
या घटनेबाबत कारागृह प्रशासनाने गुप्तता पाळली होती. मात्र, पोलीस ठाण्यापर्यंत हे प्रकरण गेल्यानंतर हा प्रकार समोर आला.

 

Web Title :- Nagpur Central Jail | prisoner dies after being beaten up by prison guard in nagpur central jail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’ – चंद्रकांत पाटील

Mumbai Police | पोलिसांनी जप्त केलेल्या स्टोअर रूममधील सिलिंडरचा स्फोट; पोलीस अधिकारी गंभीर जखमी

Sharad Pawar | ‘शाई फेकणे चूक; पण चंद्रकांत पाटलांच्या विधानाकडे…’; काय म्हणाले शरद पवार