Nagpur Central Jail | नागपूर कारागृहातील धक्कादायक प्रकार, एका सिमवरुन चार आठवड्यांत 1400 वर कॉल, कारागृहात समांतर दूरसंचार केंद्र?

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nagpur Central Jail | नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला हादरवणारी माहिती ‘मोबाईल प्रकरणाच्या’ चौकशीत (Mobile Inquiry Case) समोर आली आहे. करागृहात बंदिस्त असलेल्या विविध गुन्हेगारांनी (Criminals) आत मध्ये बसून त्यांच्या-त्यांच्या पंटर्स, म्होरके, साथीदार आणि नातेवाईकांना अनेक फोन कॉल्स (Phone Calls) केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हे प्रकरण उजेडात येण्यापूर्वी 4 आठवड्यात फक्त एका सीम कार्डवरुन तब्बल 1400 हून अधिक फोन झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहातील (Nagpur Central Jail) या खळबळजनक प्रकारामुळे कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले असून तपास करणारे पोलिसही अचंबित झाले आहेत.

 

कारागृहामध्ये (Nagpur Central Jail) मोबाईल किंवा कॅमेरा वापरण्यास, घेऊन जाण्यास मनाई आहे. जर कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी किंवा वकिलांशी बोलायचे असेल तर कारागृह प्रशासनाकडून ठराविक वेळेसाठी कैद्याला फोन दिला जातो. खबरदारी म्हणून कैदी फोनवर जेवढ्यावेळ बोलत असतो तेवढा वेळ पोलीस कर्मचारी त्याठिकाणी हजर असतात.

कुख्यात गुन्हेगार सुरज कावळे (Suraj Kawle) याला कारागृहात 15 ग्रॅम गांजा आणि 15 मोबाईल बॅटऱ्या घेऊन जाताना पकडण्यात आले होते. न्यायालयाच्या आवारातच (Court Premises) हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरु केला. यामध्ये कावळे याच्यासोबत निलंबित पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नितवणे (Suspended PSI Pradeep Nithwane) हा एकाच बॅरेकमध्ये राहात होते.
निलंबित पोलीस अधिकारी प्रदीप याच्याकडे असलेला मोबाईल सुरजनेही वापरला होता.
मोबाईल बॅटरी, सीमकार्ड आणि गांजा खरेदी करण्यासाठी प्रदिपने त्याचा भाऊ पोलीस हवालदार सचिन नितवणे (Police Constable Sachin Nitwane)
याला सुरजचा भाऊ शुभम कावळे (Shubham Kawle) याच्या खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले होते.

 

पोलिसांकडून याचा तपास सुरु असताना सुरज काळे, त्याचा भाऊ सचिन कावळे, शुभम नितवणे, सुरज वाघमारे,
भगीरथ खारगयाल, अथर्व प्रमोद खटाखटी, मोरेश्वर सोनवणे आणि मुकेश नायडू यांना बेड्या ठोकल्या.
यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात यातील एका सीमकार्डवरुन 1400 हून अधिक कॉल केल्याची माहिती उघडकीस आली.
प्रदीप नितवणे हाच या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असल्याचे निष्पन्न झाले.

 

Web Title :- Nagpur Central Jail | Shocking case of Nagpur jail, 1400 calls in four weeks from one SIM, parallel telecom center in jail?

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | …शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी देताना यावर्षीच दिरंगाई का? सुनिल प्रभूंनी केले हे वक्तव्य

 

Pune Crime | मोठ्या भावानेच केला लहान भावाचा गळा दाबून खून, पुण्यातील कोंढवा परिसरातील घटना

 

Pune Crime | गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, 8 दिवसांपासून होता बेपत्ता; लोणी काळभोर परिसरातील घटना