नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nagpur Crime | प्रेमप्रकरणातून (Love Affair) गर्भवती (Pregnant) राहिलेल्या 17 वर्षाच्या मुलीने युट्यूबवर (Youtube) व्हिडीओ पाहून गर्भपात (Abortion) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र प्रकृती खराब झाल्याने संबंधित तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना (Nagpur Police) दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी मुलीच्या प्रियकराविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार (POCSO Act) गुन्हा (FIR) दाखल (Nagpur Crime) केला आहे.
नागपूर तालुक्यातील (Nagpur Crime ) एका गावातील हे प्रकरण असून 17 वर्षाच्या मुलीचे एका 27 वर्षाच्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले होते. दोन वर्षापासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरु असल्याची माहिती आहे. वर्षभरापूर्वी तो युवक नागपूर मध्ये कामानिमित्त आला. त्याने एमआयडीसी (MIDC) परिसरात एक खोली भाड्याने घेतली होती. त्यामुळे दोघांच्या भेटी गाठी कमी झाल्या.
मात्र, संधी मिळाल्यानंतर तरुण मुलीला भेटत होता. कधी-कधी हा युवक नरखेडला (Narkhed) जात होता, तर कधी-कधी नागपूरला येत असे. काही दिवसांपूर्वी मुलगी नागपूरला आली होती. रात्री त्याच्या खोलीवर मुक्कामी थांबली. दोन ते तीन दिवस ती मुलाकडे राहिली. याच दरम्यान त्यांच्यात शरीर संबंध निर्माण झाले. यातून तिला गर्भधारणा झाली. त्रास होऊ लागल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
व्हिडीओ पाहून गर्भपात
गर्भवती राहिल्यानंतर तरुणीने याची माहिती तरुणाला दिली.
तरुण रुग्णालयात काम करत असल्याने त्याने तिला काही औषधांची नावे देऊन ती औषधं घेण्यास सांगितले.
मात्र या औषधांचा परिणाम झाला नाही. चार-पाच महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर ती घाबरली.
गर्भपात कसा करायचा हा प्रश्न तिला पडला होता. त्यावेळी तिने युट्युबवर गर्भपात करण्याचे काही व्हिडीओ पाहिले.
युट्यूबर तरुणीला काही गावरानी औषधांची माहिती मिळाली. तिने औषधे जमा करुन त्याचा काढा तयार करुन तो घेतला.
त्यामुळे तिचा गर्भपात झाला. घरी मुलगी बेशुद्ध पडली होती. बाजूला चार-पाच महिन्यांचे अर्भक (Infant) होते.
पालकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
नागपूर ग्रामीण पोलिसांना (Nagpur Rural Police) या प्रकरणाची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी युवकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी हे प्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) वर्ग केले आहे.
पोलीस आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.
Web Title :- Nagpur Crime | 17 year old girl 5 months pregnant abortion done by watching video on youtube in nagpur
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update