Nagpur Crime | नागपूर हादरलं ! 17 वर्षीय मुलीनं ‘लफडं’ उघडं पडू नये म्हणून 12 वर्षीय निष्पाप भावाला संपवलं; प्रियकरासह बहिण पोलिसांच्या ताब्यात, जाणून घ्या प्रकरण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nagpur Crime | एका 12 वर्षीय निरागस मुलाची गळा आवळून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नागपूर (Nagpur Crime) येथील वाडी पोलीस ठाण्याच्या (Wadi police) हद्दीत घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. सुजल नाशिक रामटेके (वय, 12 रा. द्रुगधामना, नागपूर) असं हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. अनैतिक संबंधाचा गावात गाजावाजा होऊ नये यासाठी ही हत्या (Murder) करण्यात आलीय. असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मृत मुलाच्या 17 वर्षीय बहिणीसह तिच्या प्रियकराला ताब्यात (Arrested) घेतले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, मृत सुजलचे (Sujal Ramteke) वडील माथाडी कामगार आहेत, तर आई खाजगी नोकरी करते. सोमवारी सुजलचे आई वडील दोघंही कामावर गेले होते. दरम्यान घरी सुजल आणि त्याची 17 वर्षीय बहीण होती. दुपारी सुजल दुकानात जातो, असं सांगून घराबाहेर पडला होता. पण दीड तासानंतर तो ‘वाचवा, वाचवा’ असं ओरडत घरी आला, त्यानंतर सुजलच्या बहिणीनं त्याला पाणी प्यायला दिलं. त्यानंतर सुजल निपचित पडला, अशी माहिती सुजलच्या बहिणीने शेजाऱ्यांना दिली आहे.

दरम्यान, पोलिसांना देखील बहिणीनं अशीच माहिती दिली. पण मुलीने सांगितलेल्या घटनाक्रमात अनेक विसंगती दिसून आल्या.
त्यानंतर घटनास्थळी आढळलेल्या आक्षेपार्ह पुराव्यामुळे बहिणीनेच भावाची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आला.
त्यामुळे पोलिसांनी संशयित आरोपी बहीण आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेत कसून चौकशी केली.
तसेच, आक्षेपार्ह पुराव्यामुळे अनैतिक संबंधांचा (Nagpur Crime) गाजावाजा होऊ नये
म्हणूनच निरागस सुजलची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे.
याप्रकरणी वाडी पोलिसांनी (Wadi police) 17 वर्षीय मुलीसह तिच्या प्रियकराला रात्री उशिरा अटक (Arrested) केली आहे.
याप्रकरणी अधिक तपास पोलिस (Nagpur Crime) करीत आहेत.

 

Web Title :- Nagpur Crime | 17 years old sister killed 12 yeards old brother with help of boyfriend to hide immoral relationship in nagpur wadi police station area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Beed Crime | ‘रंगेल’ पतीला प्रेयसीसोबत ‘गुपचूप’ ज्यूसचा ‘कार्यक्रम’ करताना पत्नीनं पाहिलं, दोघांना धो-धो धुतलं

Health Survey | भारतीयांची शारीरीक उंची वाढणे झाले बंद? संशोधनात केला हैराण करणारा दावा; जाणून घ्या किती झाली घट

Pune Crime | 15 वर्षीय मुलीच्या आईशी ‘झेंगाट’ असणार्‍यांनं केलं घृणास्पद कृत्य, ‘तिच्या’शी अश्लिल चाळे करणार्‍यावर FIR, हडपसरमधील धक्कादायक प्रकार