Nagpur Crime | एकाकीपणाला कंटाळलेल्या 34 वर्षीय महिला MD डॉक्टरची विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या, शहरात खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nagpur Crime | वैवाहिक जीवनात वितुष्ट आल्यानंतर एकाकी पडलेल्या एका 34 वर्षीय महिला डॉक्टरने विषारी इंजेक्शन (poison injections) टोचून घेत आत्महत्या केल्याची (commits suicide) घटना नागपूरमध्ये (Nagpur Crime) घडली आहे. महिला डॉक्टरने तब्बल चार विषारी इंजेक्शन टोचून घेत आपले जीवन संपवले. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मेहनतीनं MBBS आणि MD झालेल्या महिलेने अशाप्रकारे जीवनाचा शेवट केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

 

आकांक्षा अमृत मेश्राम Akanksha Amrit Meshram (वय-34 रा.नागसेननगर, जरीपटका, नागपूर) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. मृत आकांक्षा या उच्च शिक्षित असून त्यांनी कठोर मेहनत घेत MBBS आणि MD चे शिक्षण पूर्ण केलं होतं. तसेच त्या सोलापुरातील शासकीय रुग्णालयात (Government Hospital, Solapur) नोकरीवर देखील होत्या. अकांक्षा यांनी कुटुंबीयांच्या संमतीनं लग्न केलं. मात्र, काही वर्षानंतर पती-पत्नीमधील संबंधामध्ये कटुता आल्याने दोघांनी एकमेकांपासून सहमतीने घटस्फोट घेतला होता. (Nagpur Crime)

 

घटस्फोट झाल्यानंतर त्या एकट्या राहू लागल्या. दरम्यान, कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्यानंतर त्या सोलापुरातून नागपुरमध्ये (Nagpur Crime) राहण्यास आल्या. त्या आपल्या वडिलांच्या घरी पहिल्या माळ्यावर राहत होत्या. पण संसार तुटल्याने एकाकीपणाच्या भावनेनं त्यांच्या मनात घर केलं होतं. त्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांना नैराश्य आलं होतं आणि त्या तणावात होत्या. याच तणावतून शनिवारी पहाटे आकांक्षा यांनी विषाची तब्बल चार इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली.

 

 

Advt.

शनिवारी सकाळी नऊ वाजले तरी आकांक्षा चहा पिण्यासाठी खाली आली नसल्याने आई उठवण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली.
त्यावेळी आकांक्षा तिच्या बेडवर पडली होती. बाजूला विषाची चार इंजेक्शन आणि सुसाईड नोट होती.
सुसाईड नोटमध्ये आकांक्षाने लिहले की, ‘मला आता कोणाताच डॉक्टर बरा करु शकत नाही.
मी स्वत:च्या इच्छेने आत्महत्या करत आहे. आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरु नका’,
असे सुसाईड नोटमध्ये (Suicide in Nagpur) लिहले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Nagpur Crime | 34 years old woman MD doctor injects 4 poison injections herself and commits suicide in nagpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा