Nagpur Crime | नागपुरमध्ये 4 मित्रांनी फिल्मी स्टाईलने केला जिवलग मित्राचा ‘गेम’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून नागपूरमध्ये खूनांच्या (Nagpur Crime) घटना सातत्याने घडत आहेत. आज (गुरुवार) सकाळी देखील एका तरुणाचा निर्घृण खून (Nagpur Crime) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या (Pachpavli Police Station) हद्दीत चार जणांनी आपल्या एकेकाळच्या जिवलग मित्राचा चाकूने भोकसून खून (Friends brutal murder by stabbing with knife) केला. सकाळी नऊच्या सुमारास दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

गोल्डी शंभरकर (Goldie Shambharkar) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याच चार मित्रांनी गोल्डीचा खून केला. त्यांच्यातील जुना वाद पुन्हा उफाळून आल्याने चार मित्रांनी गोल्डीचा काटा काढला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा (FIR) दाखल (Nagpur Crime) करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नागपुरच्या (Nagpur Crime) पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने गोल्डीवर अचानक हल्ला केला. हा हल्ला एवढा गंभीर होता की, गोल्डी घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर परिसरामध्ये काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा (Nagpur Crime) दाखल करुन शोध सुरु केला आहे.
गोल्डीच्या खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नसली तरी,
खून करणारे चारजण सराईत गुन्हेगार (Criminal) असल्याची माहिती आहे.
आरोपींवर 2018 मध्ये वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
गोल्डी हा देखील आरोपींचा एकेकाळी चांगला मित्र होता. पुढील तपास पाचपावली पोलीस (pachpaoli police station) करीत आहेत.

 

Web Title :- Nagpur Crime | 4 friends stabbed to close friend with knife in old dispute murder in nagpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 83 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 89 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Jio-BP मुंबईच्या जवळ उघडणार पहिला Petrol Pump; 2025 पर्यंत 5,500 पेट्रोल पंप उघडण्याची योजना