Nagpur Crime | नागपुर जिल्ह्यातील संतापजनक घटना ! 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Nagpur Crime | नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील (Nagpur Crime) रामगढ येथे एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार (Rape) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपी 14 वर्षीय विधीसंघर्ष बालकाविरोधात गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. हा गुन्हा नवीन कामठी पोलिस ठाण्यात (new kamptee police station) दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, आरोपी आणि पीडित मुलीचे घर शेजारीच आहे. आरोपीने रविवारी आपल्या 7 वर्षाच्या बहिणीला सांगून 4 वर्षीय चिमुकलीला घरी बोलावून घेतले.
त्यानंतर बहिणीला फिशपॉट पाहणी आणि दुरुस्ती करण्यासाठी पाठविले.
आरोपीने अल्पवयीन मुलीला बेडरुममध्ये नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार (Rape) केला.
त्यानंतर त्यानं स्वतः चिमुकलीला तिच्या घरी सोडले. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी मुलगी सोफ्यावरून खाली पडल्याने तिच्या गुप्तांगाला मार लागल्याचे सांगितले आणि घरी पळून गेला.
मुलीच्या आईने तिच्या गुप्तांगाची पाहणी केली असता रक्त पडत असल्याचे (Nagpur Crime) दिसले.

 

दरम्यान, तात्काळ घरच्यांनी खासगी रुग्णालयात नेले. चिमुकलीवर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
यानंतर, मुलीच्या आईवडिलांनी त्वरीत नवीन कामठी पोलिस ठाण्यात (Navin kamptee police station) धाव घेतली.
आरोपीविरोधात तक्रार (FIR) दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
तर, विधिसंघर्षग्रस्त (नियमबाह्य) अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेऊन त्याला नागपूर येथील बाल कोर्टात हजर केले.
त्यानंतर आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली (Nagpur Crime) आहे.

 

Web Title : Nagpur Crime | 4 years girl physically abused in new kamptee police station area of nagpur district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Health Survey | भारतीयांची शारीरीक उंची वाढणे झाले बंद? संशोधनात केला हैराण करणारा दावा; जाणून घ्या किती झाली घट

Pune Crime | 15 वर्षीय मुलीच्या आईशी ‘झेंगाट’ असणार्‍यांनं केलं घृणास्पद कृत्य, ‘तिच्या’शी अश्लिल चाळे करणार्‍यावर FIR, हडपसरमधील धक्कादायक प्रकार

Shiv Sena MLA Shahajibapu Patil | ‘मताला प्रत्येकी 3 हजार रुपये अन् मटण वाटून लढवली होती निवडणूक; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात चर्चा