Nagpur Crime | महिलांच्या अश्लील ‘न्यूड डान्स’ प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; 10 आयोजक, 3 नृत्यांगना ताब्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nagpur Crime | नागपूर जिल्ह्यातील (Nagpur News) ब्राह्मणी येथील ‘न्यूड डान्स’ प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई (Nagpur Crime) केल्याचे समोर आले आहे. उमरेड पोलीस स्टेशन अंतर्गत (Umred Police Station) येणाऱ्या ब्राह्मणीतील ‘न्यूड डान्स’ प्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) आतापर्यंत 10 जणांवर कारवाई केली आहे. त्यांना अटक देखील करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी, ब्राह्मणीमध्ये शंकर पटाच्या आयोजनानंतर रात्री मंडपात नागपुरातील ॲलेक्स डान्स शोच्या महिला कलाकारांचा अश्लील नृत्याचा कार्यक्रम होत होता.
त्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर पसरला. यानंतर पोलिसांनी अक्शन घेण्याचं ठरवलं.
पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर (SP Vijaykumar Magar) यांनी नागपूर विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड (DySP Pooja Gaikwad) यांच्या नेतृत्वात SIT ची स्थापना केली.
SIT च्या पथकाने शनिवारी रात्रभर आरोपींना अटक करण्यास सुरूवात केली.
यामध्ये दहा जणांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.
सर्व आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांची 1 दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. (Nagpur Crime)

दरम्यान, चंद्रशेखर ऊर्फ लाला प्रभूजी मांढरे (Chandrasekhar Alias Lala Prabhuji Mandhare) (वय 35), सूरज निळकंठ नागपुरे (Suraj Nilkanth Nagpure) (वय 28), अनिल दमके (Anil Damke) (वय ४८) याला आधीच पोलिसांनी अटक केली होती.
त्यानंतर श्रीकृष्ण चाचरकर (Shrikrishna Chacharkar) (वय 35), बाळू नागपुरे (वय 40), अरुण नागपुरे (Arun Nagpure) (वय 37),
हेमंत नागपुरे (Hemant Nagpure) (वय 31), नंदू रामदास मांढरे (Nandu Ramdas Mandhare) (वय 29, सर्व रा. ब्राह्मणी),
बेताब बाबाजी सरोज (Betab Babaji Saroj) (वय 25, रा. दिघोरी), अरशद अफजल खान (वय 26, रा. छोटा ताजबाग) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तसेच, तीन नृत्यांगनांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

Web Title :- Nagpur Crime | big action by nagpur rural police in nagpur nude dance case SIT arrest 10

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा