Nagpur News : कुत्र्याच्या पिल्लाला जिवंत जाळले, गेल्या 15 दिवसातील निर्घृण हत्येची 6 वी घटना

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर जिल्ह्यातील प्रतापनगर भागात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. जिथे कुत्र्याच्या पिल्लाला जिवंतपणी जाळण्यात आले आहे. या घटनेने स्थानिक नागरिकांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या घटनेेमुळे प्राणीप्रेमींमध्ये संताप असून त्यांनी प्रतापनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सेव्ह स्पीचलेस संघटनेची संस्थापक स्मिता मिरे यांनी गुरुवारी सकाळी आपल्या कुत्र्याला फिरायला नेले. यादरम्यान, त्यांना प्रतापनगरमधील गणेश कॉलनीतील मैदानाजवळ काहीतरी जळताना दिसले. जवळ जाऊन पाहिले असता त्यांना कळले की कुणीतरी दीड ते दोन महिन्याचे कुत्र्याचे पिल्लू जाळले आहे. त्यांनी यासंदर्भात आजूूबाजूला विचारपूस केली, मात्र कोणतीही माहिती हाती लागली नाही. यानंतर मीरा राणा यांनी प्रतापनगर पोलिस स्टेशन गाठून याप्रकरणी फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध आयपीसी कलम 289, 428 तसेच अत्याचार प्रतिबंधक कायदा 1960 च्या कलम 11 (1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

15 दिवसांतील सहावी घटना :
गेल्या 15 दिवसांत कुत्र्यांना निर्दयपणे जिवे मारण्याची ही सहावी घटना आहे. यापूर्वी अज्ञात लोकांनी कुत्र्याला विष देत त्याचा मृतदेह गणेश कॉलनीत फेकून दिला. त्याच वेळी, इंदोरामध्ये पिल्लाच्या पाठीवर पेव्हर ब्लॉकने वार करत मारण्यात आले

यापूर्वी गणेश कॉलनीच्या आसपासच्या काही लोकांनी कुत्र्याच्या पिल्लाला पोत्यात फेकून दिले होते. संबंधित पिल्ला हा प्रतापनगरचा नसून बाहेरून आणून जिवंत जाळण्याची शक्यता स्मिता मीरा यांनी व्यक्त केली आहे. त्या म्हणााल्या की मनपांकडे दुर्लक्ष करूनही आम्ही या प्रदेशातील 40 हून अधिक कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण केले आहे. अमानुष पद्धतीने कुत्री मारण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. कुत्रा हादेखील समाजाचा अविभाज्य घटक आहे, हे लोक का मान्य करत नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला.