नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Nagpur Crime | पोटच्या मुलीवर तीन वर्षे सतत अत्याचार (Father Assaults On His Own Daughter) करणाऱ्या नराधम पित्याला पंधरा वर्षाचा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत (POCSO Act) ही कारवाई करण्यात आली. आरोपी महेश (बदलेले नाव) हा शाळेत शिपाई होता. तर त्याची पत्नी परिचारिका होती. या दाम्पत्यास एक मुलगी होती. पत्नी कामाला बाहेर गेल्यावर तो मुलीवर अत्याचार करत असे. (Nagpur Crime)
आरोपीने सदर मुलगी तेरा वर्षाची होईपर्यंत मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणाची सुरूवात झाल्याबरोबर मुलीने आपल्या आईला सांगितले होते. मात्र, त्यानंतर महेशने तिला धमकावले व तिने जे काही तिच्या आईला सांगितले आहे. ते सर्व खोटे आहे, असे सांगण्यास भाग पाडले. मुलीने तसेच केल्यामुळे आईने ही तक्रार खोटी असल्याचे गृहीत धरले. नंतर पुढील तीन वर्षे आरोपी पित्याकडून हा प्रकार सुरूचं राहिला. अखेर मुलीने तिच्या शाळेतील शिक्षिकेला घडला प्रकार सांगितला. (Nagpur Crime)
त्यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाकडून पिडीत मुलीच्या आईला शाळेत बोलावून ही माहिती देण्यात आली. यानंतर पिडीत मुलीच्या आईने आरोपी पतीवर पाळत ठेवायला सुरूवात केली. तिच्याकडून या प्रकाराचे चित्रीकरण १५ डिसेंबर २०१६ रोजीच करण्यात आले होते. पण, महेश आणि तिच्या नातेवाईकांच्या दबावाखाली तिने पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. सगळी परिस्थिती माहित असताना देखील आपल्या आईने तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे मुलगी वैफल्यग्रस्त झाली. तिचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले. आईने तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केले.
अखेर चाईल्ड हेल्प लाईनची (Child Helpline) मदत घेत आईने हिंमत करून जवळपास वर्षभरानंतर २० जानेवारी २०१८ रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाअंती आरोपपत्र दाखल केले.
या गुन्ह्यात आरोपी पित्याला १५ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
यावेळी अतिरिक्त सरकारी वकील वर्षा सायखेडकर यांनी सरकारची बाजू मांडली.
Web Title :- Nagpur Crime | daughter was tortured continuously for three years father punishment for fifteen years crime
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update