Nagpur Crime | लग्नाला प्रियकराने नकार दिल्यानंतर दुखावलेल्या प्रेयसीने उचलले ‘हे’ पाऊल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Nagpur Crime | नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ज्याच्यासाठी घरच्यांशी संघर्ष केला त्यानेच लग्नाला नकार दिल्याची सल मनात असल्याने त्या तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरुणीने चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यामुळे हि सगळी घटना उघडकीस आली आहे. (Nagpur Crime)

 

काय आहे नेमके प्रकरण?
दीक्षा (वय 28) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. महाविद्यालयात शिकत असताना या तरुणीचे एका मुलासोबत प्रेमप्रकरण जुळले.
ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांनी लग्नाच्या आणाभाकादेखील घेतल्या होत्या.
मात्र त्यांच्या नात्याला कुणाची तरी नजर लागली अन् तरुणीने आपला जीव दिला. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने उच्चशिक्षित तरुणी तणावात गेली अन् त्या तणावातून तिने आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे. शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये हि घटना घडली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Nagpur Crime | nagpur girl committed suicide due to mental stress boyfriend refused to marry her nagpur crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vaidehi Parashurami | अखेर वैदेही परशुरामीने यशराज मुखाटे सोबतच्या नात्याविषयी केला मोठा खुलासा

Nia Sharma | अभिनेत्री निया शर्माच्या ग्लॅमरस अदानी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले; डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे खूपच बोल्ड

Sania Mirza | सानिया मिर्झाचा अबु धाबी ओपनमध्ये पराभव; पहिल्याच फेरीत पडली बाहेर