Nagpur Crime | फेक कॉल केल्याच्या रागातून पोलिसांची तरुणाला मारहाण, अपमानित झालेल्या तरुणाची आत्महत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nagpur Crime | नागपूरमध्ये पोलिसांच्या (Nagpur Crime) मारहाणीमुळे अपमानित (Insulted by Police) झालेल्या एका तरुणाने आत्महत्या (Commits Suicide) केल्याची धक्कादयक घटना घडली आहे. मनोरुग्णाला मारहाण होत असल्याची माहिती तरुणाने नागपूर पोलिसांना (Nagpur Police) 100 नंबरवरुन दिली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला फेक कॉल (Fake call) केल्याबद्दल मारहाण (Beaten) केली असा आरोप पोलिसांवर केला जात आहे. महेश राऊत Mahesh Raut (वय-35) असे आत्महत्या (Nagpur Crime) करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

नागपूरमधील मनोज ठवकर (Manoj Thawkar) या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक घटना समोर आल्याने नागपूर पोलिसांची असंवेदनशीलता समोर आली आहे. महेश याला काल पोलिसांनी मारहाण केल्यामुळे महेशने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. महेशने 100 नंबरवर फेक कॉल केला, या कारणामुळे पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. महेश राऊत याच्या आत्महत्येमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

भर वस्तीत पोलिसांकडून मारहाण

ही घटना नागपूर जिल्ह्यातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या (Hudkeshwar Police Station) हद्दीत घडल्याची माहिती आहे. मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई (Action against police) करण्याची मागणी केली जात आहे. महेश रातऊचे नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महेशला भर वस्तीत लोकांसमोर मारहाण करण्यात आली. पोलिसांच्या मारहाणीमुळे अपमानीत झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप महेशच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

महेश ठावकर प्रकरणात 3 पोलीस निलंबित

मनोज ठावकर या दिव्यांग तरुणाला पोलिसांनी बेदम मारहाण केली.
ही घटना 7 जुलै रोजी शहरातील पारडी चौक हनुमान मंदिर परिसरात रात्री घडली.
मनोज हा मेकॅनिक होता.
तो रात्री 8-9 वाजताच्या दरम्यान घरी जात होता.
नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांनी त्याची गाडी आडवली.
मात्र, ब्रेक न लागल्याने त्याच्या दुचाकीची धडक समोरील पोलीस वाहनाला बसली.

यामुळे पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे याच्यासह तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनी मनोजला मारहाण केली. यामध्ये शुद्ध हरपल्याने मनोजला भवानी मल्टीस्पेशालिटी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
त्याने मुद्दाम धक्का दिल्याचा गैरसमज झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे (PSI Mukesh Dhoble),
नामदेव चरडे, आकाश शहाणे यांना निलंबित (Suspended) करण्यात आले आहे.

Web Title : nagpur-crime/nagpur man allegedly commits suicide after police beaten up for making fake call

Sangola Accident | सांगोला तालुक्यात ट्रक-कारचा भीषण अपघात;
कार चालकासह 2 लहान मुलींचा मृत्यू

Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया,
जाणून घ्या त्यांचे फायदे

Bombay High Court | चित्रपट, गाण्यांच्या वाहिन्यांसारखी सरकार शिक्षणासाठी पूर्णवेळ वाहिनी का सुरु करत नाही?

Pune Ganeshotsav | पुणेकरांना गणेशोत्सवासाठी महापालिकेने जारी केल्या मार्गदर्शक सूचना