Nagpur Crime | क्रिप्टो करेंसीच्या नावाखाली अनेकांची कोट्यावधीची फसवणूक, साथिदाराचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला पुण्यातून अटक; 1 कोटीचा मुद्देमाल जप्त

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nagpur Crime | क्रिप्टो करेंसीमध्ये (Cryptocurrency) गुंतवणूकीच्या (Investment) नावाखाली हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये लुबाडणारा आणि त्यानंतर आपल्याच साथीदाराची हत्या (Murder In Nagpur) करून फरार झालेला कुख्यात गुन्हेगार निशीद महादेव वासनिक Nishid Mahadev Wasnik (रा. वासीम प्राईड, नागपूर) याच्या पोलिसांनी (Nagpur Police) मुसक्या आवळल्या. पुणे पोलिसांच्या (Pune Police) मदतीने लोणावळा (Lonavala) येथे ही सिनेस्टाईल कारवाई (Nagpur Crime) करण्यात आली.

 

निशीद महादेव वासनिक, प्रगती निशिद वासनिक Pragati Nishid Wasnik (दोघे रा. वसीम प्राईड, नागपूर) गजानन भोलेनाथ मुनगुने Gajanan Bholenath Mungune (रा. भिसी, तहसील जि. चिमुर सध्या रा. राजे रघुजी नगर, नागपूर), संदेश पंजाब लांजेकर Sandesh Punjab Lanjekar (रा. गोंडेगाव खदान, कन्हान, नागपूर) अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

काय आहे प्रकरण?
आरोपींचा नागपूर (Nagpur News) येथे क्रिप्टो करेंसी चा व्यवसाय होता. या व्यवसायातून आरोपींनी तब्बल 172 लोकांकडून जवळपास 3 कोटी 70 लाख रुपये घेऊन फसवणूक (Cheating)  केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. आरोपींनी जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने नागरिकांना वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून त्यांची फसवणूक करुन फरार झाले. याबाबत नागपुर शहरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्यात (Yashodhara Nagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यात फरार झाल्यानंतर मुख्य आरोपी निशीद वासनिक व त्याच्या इतर साथिदारांनी पैशांच्या देवाण घेवाणीच्या वादातून त्यांचा सहकारी माधव पवार Madhav Pawar (रा. नागपूर) याचे त्याच्या राहत्याघरातुन अपहरण (Kidnap) करुन पांधी कुटे येथील निर्जन स्थळी नेऊन गोळ्या झाडून खून केला. याबाबत मालेगाव पोलीस स्टेशन (Malegaon Police Station) येथे गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला मात्र आरोपी पोलिसांना सापडले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्यास 50 हजार रुपये बक्षिस देण्याची घोषणा केली. (Nagpur Crime)

 

दरम्यान आरोपी नागपूर शहरातून फरार झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील (Pune District) लोणावळा येथे एक बंगलो भाड्याने घेऊन परिवारासह राहात असल्याची माहिती नागपूर स्थानिक गुन्हे शाखेला (Nagpur LCB) समजली. त्यानुसार नागपूर पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने आरोपींचा लोणावळा परिसरात शोध घेऊन त्यांना अटक केली. त्यांच्याकडून 40 हजार रुपये किमतीचे एक पिस्टल व 7 काडतुसे, 1 कोटी रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या 4 लग्जरी चारकी गाड्या, 8 मोबाईल, 1 लॅपटॉप, रोख रक्कम 18 लाख 91 हजार 210 असा एकूण 1 कोटी 13 लाख 91 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त अश्विनी दोरजे (Joint CP Ashwini Dorje),
अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी (Addl CP  Sunil Fulari), पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे अक्षय शिंदे (DCP Akshay Shinde),
सहायक पोलीस आयुक्त रोशन पंडीत (ACP Roshan Pandit)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पर्वते (Senior Police Inspector Kishor Parvati),
सहायक पोलीस निरीक्षक पवार (API Pawar), पोलीस उपनिरीक्षक मोहेकर (PSI Mohekar),
तांबूसकर, बलराम झाडोकर, संतोष मदनकर, राजेश तिवारी, प्रशांत कोडापे, आशिष ठाकरे, सचिन आंधळे,
योगेश गुप्ता, सुरज भोंगाळे, सुहास शिंगणे, दिपक चौव्हान, सुनिल कुंवर, रवी शाहु, शेषराव राऊत, रोनॉल्ड एंथोनी,
श्याम कडु, रामनरेश यादव, महेंद्र सडमाके, किशोर ठाकरे, हेमा बच्छे,
चालक पोलीस शिपाई प्रविण रणदिवे, मंगल जाधव, प्रविण चव्हाण यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Nagpur Crime | Nagpur Police Arrest Nishid Mahadev Wasnik from pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Khadse | ‘मी टरबुज्या म्हणणार नाही पण…’; नाथाभाऊ देवेंद्र फडणवीसांवर बरसले !

 

Pune Crime | पुण्याच्या कात्रज परिसरातील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला 12 तासात अटक

 

Heart Failure | ‘या’ कारणांमुळे होते हार्ट फेल ! वाचण्यासाठी डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत