Nagpur Crime | चाकूने सपासप वार करून मित्राला संपवले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nagpur Crime | उसने घेतलेले २ हजार रुपये मागितल्याच्या कारणावरून धारदार चाकूने सपासप वार करून मित्रानेच मित्राचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. रोशन पुरी Roshan Puri (वय १९) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना दिघोरी घाटात (Dighori Ghat) झाली आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून एक फरार आहे. (Nagpur Crime)

 

प्राथमिक माहितीनुसार, रोशन पुरी कॅटरिंग सर्व्हिस सेंटरमध्ये काम करत होता. तर अनमोल सुखराम मेश्राम हा कार वॉशिंग सेंटरमध्ये काम करतो. दोन वर्षांपूर्वी अनमोल याने रोशनकडून २ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर वारंवार पैसे मागूनही अनमोल ते परत करत नव्हता. त्यावरून दोघांमध्ये वादावादी होत होती. सतत पैसे मागतो म्हणून अनमोल चिडलेला होता. सोमवारी रात्री अनमोल, त्याचा एक मित्र चेतन आणि रोशन हे एकमेकांना भेटले. दिघोरी घाटाजवळ योगेश्वरनगर येथे रोशन याला ते घेऊन गेले. तेथे पुन्हा पैशांवरून वादावादी झाली. संतापलेल्या अनमोलने धारदार चाकूने रोशनवर सपासप वार करून खून (Murder in Nagpur) केला. त्यामध्ये रोशनचा मृत्यू (Nagpur Crime) झाला. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत दोन आरोपींना ताब्यात घेतले तर अद्यापही एक जण फरार आहे.

 

Web Title :-  Nagpur Crime | nagpur youth allegedly killed his friend crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा