Nagpur Crime News | धक्कादायक ! नायलॉन मांजामुळे 11 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Nagpur Crime News | आज सर्वत्र मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यादरम्यान नागपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी एका 11 वर्षीय चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागला आहे. नायलॉन मांजाने गळा कापल्याने या 11 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. (Nagpur Crime News)

 

काय आहे संपूर्ण प्रकरण
वेद साहू असे 11 वर्षीय मुलाचे नाव आहे. तो शनिवारी सायंकाळी त्याच्या वडिलांसोबत दुचाकीवरून जात होता.
यावेळी अचानक मांजा आला व त्याचा गळा कापला गेला. त्यात तो जखमी झाला. त्याला तातडीने मानकापूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार झाले नाही यानंतर त्याला धंतोलीतील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. जखम गंभीर होती आणि उपचार मिळायला उशीर झाला. यामुळे 11 वर्षीय वेदला आपला जीव गमवावा लागला. (Nagpur Crime News)

 

नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली आहे.
हसतखेळत असलेल्या वेदवर डोळ्यासमोर काळाने घाला घातल्याने पालक व नातेवाईक यांना, मोठा धक्का बसला आहे.
हा घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Web Title :- Nagpur Crime News | 11 year boy died due to nylon manja in nagpur on makar sankranti 2023 know in detail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘माझी महिलांना विनंती आहे, जास्त पलटण वाढवू नका’, अजित पवारांचा सल्ला अन् एकच हश्शा

Nepal Plane Crash | नेपाळमध्ये यती एअरलाइन्सचे विमान कोसळलं, 32 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

Jalgaon Crime | जळगाव हादरलं! 16 वर्षीय मुलासोबत आरोपीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य