Nagpur Crime News | नागपूर हादरलं! पाण्याच्या टाकीत पडून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Nagpur Crime News | नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नागपूर शहरातील बेसा परिसरात पाण्याच्या टाकीत एका पाच वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. लतरोडी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या बेसा परिसरातून गुरुवारी अचानक हि पोरगी खेळता खेळता अचानक बेपत्ता झाली. यानंतर या मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र तिचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. यानंतर तिचा सर्वत्र शोध सुरु झाला मात्र तिचा कुठेच पत्ता लागला नाही. यानंतर शुक्रवारी सकाळी घराजवळील टाकीत या मुलीचा मृतदेह आढळून आला. खेळता खेळता ही मुलगी या टाकीपर्यंत पोहोचली असावी यादरम्यान तिचा तोल जाऊन ती टाकीच्या पाण्यात पडली असावी अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Nagpur Crime News)

 

काय आहे नेमके प्रकरण?
बेसा परिसरात कुटुंबासह राहणारी 5 वर्षीय निष्पाप ज्योती साहू ही गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घरासमोर खेळत होती. त्यादरम्यान अचानक खेळत असताना ती घरासमोरून अचानक बेपत्ता झाली. यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण तिचा काही थांगपत्ता लागला नाही. यानंतर हताश होऊन कुटुंबीयांनी बेलतरोडी पोलिस ठाण्यात ती मिसिंग झाल्याची तक्रार दाखल केली. या मृत चिमुकलीचे नाव ज्योती असे होते. यानंतर दुसऱ्या दिवशी घराजवळील मोकळ्या जागेत बांधलेल्या टाकीत ज्योतीचा मृतदेह आढळून आला. बेलतरोडी पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. (Nagpur Crime News)

 

Web Title :- Nagpur Crime News | 5 year old girl fell into a water tank nagpur crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | लोणीकंद पोलिसांची हातभट्टी दारु बनविणाऱ्या भट्टीवर कारवाई, दारु बनवण्याचे 3 हजार लिटर कच्चे रसायन केले नष्ट

Parbhani Crime News | घरात बहिणीच्या लग्नाची तयारी सुरु असताना चुलत भावाची आत्महत्या

Pune Chinchwad Bypoll Election | चिंचवड पोटनिवडणूक : चिंचवडमध्ये तिरंगी लढत, पोटनिवडणूक लढवण्यावर राहुल कलाटे ठाम