Nagpur Crime News | चॉकलेटचे आमिष देऊन आरोपीकडून 7 वर्षीय चिमुकल्यावर अत्याचार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Nagpur Crime News | नागपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये आरोपीने घरासमोर खेळणाऱ्या चिमुरड्याला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. नागपुरातील जरीपटका परिसरामध्ये हि घटना घडली आहे. स्टॅनली सिल्वेस्टन जोसेफ (29, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. तो गुन्हेगार प्रवृत्तीचा आणि विकृत असून त्याच्याविरुद्ध वस्तीमध्ये तक्रार दाखल आहेत. (Nagpur Crime News)
काय आहे नेमके प्रकरण?
पीडित 7 वर्षीय चिमुकला मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घरासमोर खेळत होता. यावेळी स्टॅनलीने त्याला एक चॉकलेट आणि 10 रुपये दिले. त्यानंतर त्याला आणखी चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. त्या ठिकाणी त्याने या मुलावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर हा पीडित मुलगा रडत घरी आला आणि त्याने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर आईने आपल्या मुलाला सोबत घेऊन जरीपटका पोलिसांत धाव घेतली आणि त्या नराधमाविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपी नराधम स्टेनलीला अटक केली. (Nagpur Crime News)
Web Title :- Nagpur Crime News | 7 year old boy molested by man in nagpur complaint filed and police arrest the accused
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Beed Crime News | शेतातील काम आटोपून घरी येत असताना मद्यधुंद कारचालकाने दिलेल्या धडकेत 65 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू
- Parbhani Crime News | आईला भेटायला जात असताना तरुणाचा अपघाती मृत्यू; परभणीमधील घटना
- Pune Crime News | हाच तो हाच आहे तो म्हणत तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न;
टोळक्याने केली रिक्षाचालकाला मारहाण