Nagpur Crime News | प्रेयसीवर अत्याचार करुन निर्घृण खून, आरोपी प्रियकर गजाआड

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूर (Nagpur Crime News) मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये प्रियकरानेच आपल्या प्रेयसीवर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या (Murder) केली आहे. दीपक इंगळे (Deepak Ingle) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. मृत महिलेची मिसिंग तक्रार नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्यात (Wathoda Police Station) करण्यात आली होती. या तक्रारीवरून तपास सुरू असताना हि घटना समोर आली आहे. या प्रकरणी या महिलेचा प्रियकर दीपक इंगळेची कसून चौकशी केली असता त्याने या हत्येची कबुली दिली आहे. सुषमा काळवंडे (Sushma Kalwande) असे मृत महिलेचे नाव आहे.

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दीपक इंगळेचे मृत महिला सुषमा काळवंडे सोबत प्रेम संबंध होते. दीपक या महिलेला 23 तारखेला हिंगणा भागातील रुई शिवारात घेऊन गेला. याच ठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केले आणि त्यानंतर तिच्या डोक्यावर दगडाने वार करून तिची हत्या केली. हत्या केल्यावर दीपक तिथून पळून गेला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

गेल्या दोन ते तीन वर्षापासून दीपक इंगळे आणि सुषमा यांच्यात प्रेम संबंध होते.
23 मार्चला सुषमा काळवंडे ही बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला
असता दीपकला चौकशीसाठी ठाण्यात बोलावण्यात आले.
यावेळी चौकशी करत असताना त्याला काही प्रश्नही विचारण्यात आले. यानंतर दीपकने गुन्ह्याची कबुली दिली.
दीपकला अटक केल्यानंतर पोलिस त्याला घटनेच्या ठिकाणी घेऊन गेले असता दीपकने सुषमाची कुठे हत्या केली
ती जागा दाखवली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Web Title :- Nagpur Crime News | boyfriend rapes his girlfriend and then kills her with a stone a shocking incident in nagpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | महिलांनी गावात मारहाण केल्याने खाणीत उडी मारुन रिक्षाचालकाची आत्महत्या; धानोरीतील घटना

Pune Crime News | वानवडी गावात टोळक्याचा धुडगूस; वाहनांवर दगडफेक करुन केली नासधुस

Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत