Nagpur Crime News | BSF जवानाच्या पत्नीला अमानुष मारहाण; गर्भपात करण्यास नकार दिल्याने उचलले ‘हे’ पाऊल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Nagpur Crime News | नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये गर्भपातास नकार देणाऱ्या पत्नीला अमानुष मारहाण करून BSF जवान फरार झाला आहे. या प्रकरणी BSF जवान व त्याच्या आईवडिलांविरुद्ध नागपूरमधील वाडी पोलिस स्टेशनमध्ये हुंड्यासाठी छळ व मारहाणीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. विपुल सुरेश सराफ (वय 32, मूळ रा. रेणुकानगर, डाबकी रोड, अकोला) त्याचे वडील सुरेश व आई उमा, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Nagpur Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?
विपुल हा सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) जवान असून सध्या तो शिलाँग येथे तैनात आहे. नेहा विपुल सराफ (वय 24, रा. शिवाजीनगर, कंट्रोल वाडी) यांचे जून 2020 मध्ये विपुल बरोबर लग्न झाले. दोघांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये कारंजा तालुक्यातील खेराडा गाव येथील मंदिरात लग्न झाले. यानंतर दागिने घेण्यासाठी नेहाच्या वडिलांनी विपुल व त्याच्या नातेवाइकांना पाच लाख रुपये दिले. त्यावेळी विपुल लखनौ याठिकाणी तैनात होता. लग्नाच्या काही दिवसानंतर सासू-सासऱ्याने नेहा यांचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. यानंतर नेहाच्या माहेरच्या नातेवाईकांनी मध्यस्थी करून वाद मिटविला.

यानंतर नेहा पुन्हा लखनौ येथे गेल्या. तेथेही त्यांचा छळ करण्यात येऊ लागला. त्यामुळे त्या पुन्हा माहेरी आल्या.
यादरम्यान विपुलची शिलाँग या ठिकाणी बदली झाली.
यानंतर नेहाने शिलाँगमधील कार्यालयात पत्रव्यवहार करून विपुल छळ करीत असल्याची माहिती दिली.
यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेहा व विपुलची समजूत घातली. त्यानंतर काही दिवस नेहा तेथेच थांबल्या.
यावेळी त्या गर्भवती राहिल्या. यानंतर विपुल गर्भपात करण्यासाठी नेहावर दबाव आणू लागला मात्र नेहाने त्यास नकार दिला. यानंतर विपुलने नेहाला मारहाण केली व पसार झाला.
यावेळी शेजारी राहणाऱ्या जवानाने नेहा यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
उपचारानंतर नेहा यांना सोडण्यात आले मग त्या नागपुरात आल्या.
यानंतर विपुल हा नेहाला मोबाइलवरून धमकी देऊ लागला.
अखेर नेहा यांनी या सगळ्याला कंटाळून वाडी पोलिसांत तक्रार दाखल केली.
वाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Web Title :- Nagpur Crime News | bsf jawan brutally beat his wife in nagpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rakhi Sawant | गरोदर असल्याच्या चर्चांवर राखी सावंतने सोडले मौन ; आदिल खानवर केले गंभीर आरोप

Onkar Bhojane – Vanita Kharat | ओंकार आणि वनिताच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल; वनिताच्या नवऱ्याने या भेटीनंतर दिली ‘ही’ रिअ‍ॅक्शन