Nagpur Crime News | एका शुल्लक कारणावरून पतीने केली पत्नीची हत्या मग स्वतःदेखील केली आत्महत्या; नागपूरमधील घटना

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Nagpur Crime News | नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शेतमजुराने आपल्या पत्नीची हत्या (Murder) केली आणि मग स्वतः गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. ही थरारक घटना रामटेकनजीकच्या आमडी शिवारामध्ये गुरुवारी रात्री घडली (Nagpur Crime News) आहे. कुसुमबाई मधुकर युवनाती (वय 43), मधुकर धोबा युवनाती (वय 53) असे या मृत पती- पत्नीचे नाव आहे.

काय घडले नेमके?
कुसुमबाई मधुकर युवनाती व मधुकर धोबा युवनाती हे मध्य प्रदेशातील सौंसरचे मूळ रहिवासी असून, सध्या आमडी शिवारात राहत होते. आमडी येथील पशुपालक चैतराम भालचंद बसोले यांनी जनावरांच्या देखभालीसाठी मधुकरला मजुरीवर ठेवले होते. त्यांनी त्याला राहायला खोलीही दिली होती. त्या ठिकाणी तो एकटाच राहत होता. तसेच त्याची पत्नी कुसुमबाई मुलांसोबत कोर्थुना (ता. सावनेर) या ठिकाणी राहत होती. (Nagpur Crime News)

घटनेच्या दिवशी म्हणजेच 16 फेब्रुवारीला कुसुमबाई ही आमडी येथे आली. त्या ठिकाणी दोघांनी जेवण केले. यानंतर दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. याचा राग मनात धरून मधुकरने आपल्या पत्नीची हत्या केली आणि मग स्वतः आत्महत्या केली. सकाळी शेतमालक चैतराम हे मधुकर का उठला नाही, म्हणून पाहायला गेले. तेव्हा दार बंद होते. आतून कोणताच प्रतिसाद आला नाही म्हणून त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा मधुकर गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये तर कुसुमबाई रक्तबंबाळ होऊन बाजूला मृतावस्थेत पडली होती.

यानंतर चैतराम यांनी तातडीने गावच्या पोलीस पाटलाला याची माहिती दिली.
तसेच पोलिसांनादेखील कळवण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस ठाण्याचे ठाणेदार तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी आशित कांबळे घटनास्थळी दाखल झाले.
यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जवळच्या तलावाची तपासणी केली असता त्यांना एक कुऱ्हाड आढळून आली.
यावरून मधुकरने आधी पत्नी कुसुमबाईचा खून केला, नंतर स्वतः गळफास घेतला अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
मधुकरने हे टोकाचे पाऊल नेमके का उचलले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
रामटेक पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title :-Nagpur Crime News | ending his wifes life husband also ended his own life in nagpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ravindra Jadeja | जडेजाने कसोटीत रचला विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला तर जगातील दुसरा खेळाडू

Pravin Darekar | शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘पवारांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व…’