Nagpur Crime News | मायलेकावर काळाचा घाला ! वाढदिवसाची पार्टी आटोपून घरी येताना भिषण अपघात; दोघांचा मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Nagpur Crime News | नागपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये वाढदिवसाची पार्टी (Birthday Party) आटोपून घरी येत असताना रस्ते अपघातात मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. भरधाव कारने दिलेल्या धडकेत मायलेकरांचा मृत्यू झाला तर एक वृद्ध महिला जखमी झाली आहे. हि धक्कादायक घटना रविवारी रात्री बेलतरोडी पोलिस स्टेशन (Beltarodi Police Station) हद्दीतील वर्धा मार्गावरील खापरी या ठिकाणी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. (Nagpur Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?
देवकाबाई महादेवराव पुंजरवार (वय ७२) आणि त्यांचा मुलगा गणेश (वय ५३, दोन्ही रा. सुयोगनगर, अजनी) अशी या अपघातात मृत पावलेल्या मायलेकरांची नावे आहेत. तर सुधाबाई सुधाकर गोरशेट्टीवार (वय ७१, रा. ओमनगर) असे जखमी झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. मृत देवकाबाई यांच्या मुलीची सासू सुधा यांचा रविवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त खापरीतील तृप्ती हॉटेलमध्ये सर्व नातेवाइक जेवायला गेले होते. (Nagpur Crime News)

यावेळी सर्वजण रस्ता पार करून कारजवळ जात होते. याचवेळी वर्ध्याकडून येणाऱ्या भरधाव कारने सुधा, गणेश व देवकाबाई या तिघांना जोरदार धडक दिली. या अपघातानंतर आरोपी कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातातील जखमींना एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या अपघाताप्रकरणी कारचालकाविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे बेलतरोडी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

बाईक अपघातात बापाच्या डोळ्यादेखत 20 वर्षीय मुलाचा मृत्यू
अमरावतीमध्ये कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर मुलाचे वडील गंभीर जखमी झाले.
हा अपघात शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास वलगाव ठाण्याच्या हद्दीतील चांदूरबाजार-शिराळा या महामार्गावर घडला आहे.
यश संजय गोटेकर (20) असे मृत मुलाचे तर संजय अजाबराव गोटेकर (53) असे या अपघातात जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे.
याप्रकरणी वलगाव पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title :-  Nagpur Crime News | mother and son died in accident while going home after birthday party

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vasai Crime News | ‘मरने दे साले को’ म्हणत कारचालकाने वाहतूक पोलिसाला दीड किलोमीटर फरफटत नेलं

Pune Crime News | सेक्‍सटॉर्शन प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर