Nagpur Crime News | झोपडीच्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Nagpur Crime News | नागपूरमध्ये झोपडीच्या वादातून आरोपीने महिलेवर चाकूने हल्ला केला आहे. यानंतर या महिलेला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरती निकोलस (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे तर बादल कुंभरे (वय 28) असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. हि घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Nagpur Crime News)
काय घडले नेमके?
मृत आरती निकलोस आणि आरोपी बादल कुंभरे दहीकर झेंड्याजवळ शेजारी राहतात. शनिवारी दुपारी झोपडीच्या जागेवरून दोघांमध्ये वाद झाला. मृत महिला आणि आरोपी हे दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे त्यांच्यात अनेक गोष्टींवरून वाद होत होते. या प्रकरणी अनेकदा त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी याच वैमनस्यातून सकाळपासूनच या दोघांमध्ये भांडणं सुरू झाले. यावेळी आरोपीला आपला राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात घरातून चाकू आणून महिलेवर थेट हल्ला केला. (Nagpur Crime News)
या हल्ल्यात आरती गंभीर जखमी झाली. इमामवाडा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी
तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेच्या वेळी मृत महिलेची आई सुमनबाई गवळी या
तिच्याजवळच उभ्या होत्या. यावेळी आरोपीने त्यांच्यावरही चाकू उगारला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Web Title :- Nagpur Crime News | nagpur crime a woman lost her life in an attack by a man over a hut dispute
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Thane Crime News | कळवा-विटावा परिसरात खोलीतील स्लॅबचे प्लास्टर पडून दोन चिमुकले जखमी