Nagpur Crime News | ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या वादातून आरोपी कार चालकाकडून महिलेला मारहाण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Nagpur Crime News | नागपूरमध्ये एक लाजीरवाणी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आपल्या कारला ओव्हरटेक केलं म्हणून, राग आलेल्या आरोपी व्यक्तीने भर चौकात ओव्हरटेक करणाऱ्या महिलेला मारहाण केली आहे. या मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी या व्यक्तीवर संताप व्यक्त केला आहे. (Nagpur Crime News)

शिवशंकर श्रीवास्तव असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. ही घटना काल दुपारी एक वाजता इंदोरा चौकातून भीम चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आरोपी कार चालक इंदोरा चौकातून भीम चौकाकडे जात होता. यादरम्यान मागून दुचाकीवरून येणाऱ्या महिलेने या व्यक्तीच्या गाडीला ओव्हरटेक केले. हि महिला आपल्याला ओव्हरटेक करून पुढे गेल्याने आरोपी कार चालकाने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर पीडित महिलादेखील आरोपीशी वाद घालू लागली.

यानंतर पीडित महिला आणि आरोपीमधील वाद एवढा वाढला कि आरोपीने या महिलेला भरचौकात मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीने महिलेच्या तोंडावर अनेक वार केले. त्याचवेळी त्याने तिचे केस धरून ओढले.
हा सगळा प्रकार पाहून आजूबाजूच्या लोकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला,
मात्र त्याने महिलेला मारहाण करणे सुरूच ठेवले. आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी करून पीडित महिलेला आरोपीपासून वाचवले.
या मारहाणीप्रकरणी आरोपींविरोधात जरीपटका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :- Nagpur Crime News | the accused car driver beat up the woman due to a dispute over overtaking

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी चिंचवडमध्ये झळकले कुख्यात गुन्हेगार नीलेश घायवळच्या वाढदिवसाचे बॅनर्स, प्रचंड खळबळ

CCTV In Police Stations | राज्यातील 1 हजार 82 पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत – देवेंद्र फडणवीस

Maharashtra Farmer News | शेतकर्‍याची यशोगाथा ! मेहनत, जिद्द आणि शासनाची साथ; खडकाळ माळरानावर फुललेल्या फळबागेचा शेतकऱ्याला हात