Nagpur Crime News | नागपूरमध्ये बर्निंग ट्रकचा थरार ! शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला भीषण आग

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Nagpur Crime News | नागपूरमध्ये आज सकाळी बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. नागपूर भंडारा रोडवर ही घटना घडली आहे. भंडारा रोडवर (MH 30 BD 4422) या नंबरच्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. ट्रकला आग लागल्याचे चालकाच्या वेळीच लक्षात आल्यामुळे तो तातडीने ट्रकबाहेर पडला. त्यामुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हि आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समोर आले आहे. (Nagpur Crime News)

 

काय घडले नेमके?
ही भंडारा रोड, सुरूची मसाले कंपनी, उमिया धाम, नाका नं. 05 या ठिकाणी घडली आहे. अपघातग्रस्त ट्रक मसाले (तेजपान) घेऊन जात असताना हि दुर्घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने चालक आणि त्यासोबत असणाऱ्या एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. हि आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्रकमधून लगेच उडी मारल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. (Nagpur Crime News)

 

हा ट्रक मसाले घेऊन जात होता. शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला हि भीषण आग लागली. बघता बघता या आगीने रौद्ररुप धारण केले. ट्रकमधील मसाल्याचे पोते आणि ट्रक जळू लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक रोडच्या एका बाजूला उभा केला आणि याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले मात्र ट्रकचे केबिन जळून खाक झाले होते. या घटनेमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचे आणि मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

 

Web Title :- Nagpur Crime News | truck caught on fire caused by a short circuit on bhandara road in nagpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ileana D’Cruz | इलियाना डिक्रुझला तमिळ सिनेसृष्टीतून केलं बॅन? समोर आले ‘हे’ कारण

Mango Eating Tips | आंबे खाण्यापूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा फायद्यांऐवजी होऊ शकते नुकसान

Kamlakar Nadkarni Passed Away | ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि लेखक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन