Nagpur Crime | पीडित विद्यार्थिनी सहा महिन्यांची गर्भवती, प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल

0
267
Nagpur Crime | ninth class girl six months pregnant nagpur
file photo

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Nagpur Crime | नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 16 वर्षीय मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपी प्रियकराला अटक केली आहे. (Nagpur Crime)

काय आहे नेमके प्रकरण ?
पीडित मुलीची आणि आरोपीची जुनी ओळख आहे. विश्वास विनोद समुद्रे (20, ठक्करग्राम, पाचपावली) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. फार जुनी मैत्री असल्याने दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. यानंतर हे दोघे रोज एकमेकांना भेटायला लागले. जून 2022 मध्ये मुलगी घरात एकटी असताना आरोपी विश्वास त्याठिकाणी आला आणि त्याने मुलीकडे शारीरिक संबंधाची मागणी केली.

या सगळ्याला पीडितेने नकार दिला तरीदेखील आरोपींने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध स्थापित केले.
त्यानंतर तो वारंवार घरी येऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायला लागला. यानंतर प्रियकराच्या त्रासाला कंटाळलेल्या मुलीने त्याला संबंधास नकार दिला. यानंतर आरोपीने तिला बदनामी करण्याची धमकी दिली आणि तिचे शोषण करणे चालूच ठेवले. यादरम्यान स्विटी गर्भवती झाली. काही दिवसांपूर्वी स्वीटीची तब्येत अचानक बिघडल्याने कुटुंबीयांनी तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी पीडित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेला सगळा प्रसंग सांगितला. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी विश्वासला अटक केली आहे.

Web Title :- Nagpur Crime | ninth class girl six months pregnant nagpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parbhani Accident | झेंडावंदनला जाताना रील बनवणं बेतलं जीवावर, भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी

MP Sanjay Raut | ‘मविआत तणाव, मविआचा भाग व्हायचं असेल तर…’, संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला

Maharashtra Politics | नाशिकमधील भाजपचा मोठा नेता ठाकरे गटाच्या वाटेवर; मंत्री दादा भुसेंनी दिल्या अनोख्या शैलीत शुभेच्छा, म्हणाले…