Nagpur Crime | कुख्यात गुंड शोएब सलीम खानचा कारागृह अधिकारी हेमंत इंगोले यांच्यावर जेलमध्येच प्राणघातक हल्ला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nagpur Crime | कुख्यात राजा गौस टोळीचा (Rja Gauss Gang) सदस्य असलेला गुंड शोएब सलीम खान (Shoaib Salim Khan) यांने कारागृह अधिकारी हेमंत इंगोले (Prison Officer Hemant Ingole) यांच्यावर कारागृहातच प्राणघातक हल्ला (Attack) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अचानक झालेल्या हल्ल्यात हेमंत इंगोले जखमी (Nagpur Crime ) झाले आहे. कारागृहातील कर्मचारी आणि अन्य कैद्यांच्या मदतीने शोएब सलीम खानला आवरण्यात आले, मात्र त्यानंतर त्याची धुलाई करण्यात आल्याने तो थेट रुग्णालयात पोहचला आहे. हेमंत इंगोले यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलीस ठाण्यात (Dhantoli Police Station) शोएब सलीम खान विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

सात वर्षांपूर्वी राजा गौस आणि त्याच्या चार साथीदारांनी नागपूर मध्यवर्ती कारागृहाची (Nagpur Central Jail) अभेद्य सुरक्षा व्यवस्था भेदून पळ काढला होता. गुंड शोएब सलीम खान 2013 पासून मोक्का कायद्याअंतर्गत (MCOCA Action) Mokka कारागृहात कैद आहे. तो 2015 साली राजा गौसच्या मदतीने जेल मधून पळून गेला होता. त्याला अटक (Arrest) झाल्यानंतर स्वतंत्र बॅरेक मध्ये ठेवण्यात आले होते. त्याचा राग मनात धरून शोएब सलीम खानने तुरुंग अधिकारी हेमंत इंगोले यांच्यावर हल्ला केला असल्याचं निष्पन्न झालं आहे. (Nagpur Crime)

काही दिवसांपूर्वी शोएब सलीम खानच्या बॅरेकची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यात धारधार तार आणि काही आक्षेपार्ह साहित्य (Offensive Material) मिळून आले होते. त्यामुळे तो पुन्हा काही तरी मोठं करण्याच्या तयारी होता, या शंकेला वाव असल्याने जेल अधिकाऱ्यांनी त्याची सखोल चौकशी केली होती. त्याच रागातून शोएब सलीम खानने हेमंत इंगोले यांच्यावर हल्ला केला आहे.

 

Web Title :- Nagpur Crime | notorious goon shoaib salim khan attacks prison officer Hemant Ingole in nagpur central jail

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा