Nagpur Crime | नागपूरमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, पेन्शनर महिला चालवायची रॅकेट

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nagpur Crime | गुन्हे शाखेच्या (Nagpur Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाच्या (Social Security Cell, Nagpur) पथकाने एका सेक्स रॅकेटचा (Prostitute Racket) भांडाफोड केला आहे. हुडकेश्वर पोलीस ठाणे (Hudkeshwar Police Thane) परिसरात ही कारवाई केली आहे. महत्वाचे म्हणजे एक पेन्शनर महिला (Pensioner Woman) हे सेक्स रॅकेट चालवत (Nagpur Crime) असल्याचे समोर आले आहे. रेखा उर्फ अनिता पाचपोर (Rekha alias Anita Pachpore) असे या महिलेचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नरसाळा मार्ग येथील संत ज्ञानेश्वर नगरात सेक्स रॅकेट असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिंसानी त्या ठिकाणी एक बनावट ग्राहक पाठवला, असता ही माहिती खरी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून दोन मुलींची सुटका केली. तर रेखा उर्फ अनिता पाचपोर हिला अटक (Arrest) केली. हे रॅकेट चालवणारी रेखा ही मूळची अमरावती (Amravati) येथील आहे. तिला पतीची पेन्शनही मिळत असून तिला एक मुलगा आणि मुलगी आहेत. दोघांचेही लग्न झाले असून वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्यामुळे रेखा ही घरी एकटीच राहत होती. तिच्या घरीच हा सर्व प्रकार सुरु होता. (Nagpur Crime)

 

रेखा ही गरजू आणि गरीब महिलांना तसेच मुलींना आपल्या जाळ्यात ओढायची.
त्यानंतर ती त्यांना देहव्यापारात ढकलायची. ग्राहकांकडून जे पैसे मिळत होते.
त्यातील निम्मी रक्कम रेखा देहव्यापार करणाऱ्या महिलांना देत होती. यापूर्वीही तिच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Web Title :- Nagpur Crime | pensioner woman runned prostitution racket in nagpur police rescue two woman

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा