Nagpur Crime | धक्कादायक ! ‘या’ कारणामुळं महिलेनं You Tube वरील व्हिडीओ पाहून पोटातलं बाळ ‘पाडलं’, केला गर्भपात; जाणून घ्या प्रकरण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nagpur Crime | एका बलात्कार पिडीत महिलेनं युट्युबवर (YouTube) गर्भपाताचे व्हिडीओ बघून घरातच स्वतःचा गर्भपात केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना नागपूर (Nagpur Crime) शहरात घडली आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे त्या महिलेच्या प्रियकरानं गर्भपातासाठी (Abortion) तिच्यावर दबाव आणला होता. यामधून ही घटना घडली आहे. गर्भपात केल्यानंतर आरोपीने भ्रुण (बाळ) ओसाड भागात पुरलं. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे.

आरोपीने दारु पिऊन तिच्यावर जबरदस्ती केली होती. तिचे तो वारंवार शोषण करत होता. त्यातून ती गरोदर (Pregnant) राहिली. त्याने लग्नास नकार दिल्याने बदनामीच्या भीतीने घरचे मुंबईला गेले असताना तिने स्वतःच गर्भपात (Abortion) केला. असं त्या महिलॆनं सांगितलं आहे. दरम्यान, आरोपीने भ्रुण पुरलेल्या ठिकाणी शोध घेऊनही भ्रुण सापडले नाही. पोलिसांनी डीएनए सॅम्पलिंगसाठी भ्रुणाचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न केला पण काही सापडले नाही. त्या परिसरात भ्रुणाचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यशोधरानगर पोलीस ठाण्याचे पीआय संजय जाधव (PI Sanjay Jadhav) सांगितले आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

सोहेल खान (Sohail Khan) असं आरोपीचे नाव आहे. हा वाहन चालक आहे. येथील 24 वर्षीय महिलेचे सोहेल खान या वाहनचालकासोबत अवैध प्रेमसंबंध (love affair) होते. 2016 सालापासून त्यांचे प्रेमसंबंध होते. आरोपी सोहेल याची आधीच 2 लग्न झाली होती. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेऊन त्याने दुसरे लग्न केले होते. तिच्यापासून त्याला एक अपत्य देखील होते. दरम्यान, या तरुणीला सोहेलने प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते.

प्रेम जुळल्यानंतर सोहेलने तिच्यासोबत जबरदस्तीने पन्नास पेक्षा अधिक वेळा शारीरिक संबंध ठेवले.
त्यातून ती गरोदर राहिली. तिने लग्नाबाबात विचारणा केली. मात्र आरोपीने लग्नाला नकार दिला.
त्यानंतर त्या तरुणीला गर्भपातासाठी (Nagpur Crime) आरोपीने दबाव आणला.
बदनामी होऊ नये या धास्तीने तिने यूट्यूब व्हिडीओ पाहून स्वतःच गर्भपात (Abortion) करण्याचा निर्णय घेतला.

Web Titel :- Nagpur Crime | rape survivor watches videos youtube and do self abortion in nagpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | महापालिकेत 3 कोटीचा अपहार झाल्याचा शिवसेनेच्या नीलेश गिरमेंचा आरोप, म्हणाले – संबंधितांवर गुन्हे दाखल करा’

Multibagger Stock | 21.49 रुपयांचा स्टॉक झाला 343.5 चा, तीन महिन्यात 1 लाखाचे झाले 15.98 लाख रुपये; तुमच्याकडे आहे का?

Pune Mumbai Expressway | पुणे मुंबई हायवेवर लोखंडी साहित्य घेऊन जाणारा कंटेनर उलटला; पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक खोळंबली