Homeक्राईम स्टोरीNagpur Crime | धक्कादायक ! नागपूरमध्ये महिला डॉक्टरची निर्घृणपणे हत्या

Nagpur Crime | धक्कादायक ! नागपूरमध्ये महिला डॉक्टरची निर्घृणपणे हत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन –  नागपुरातील नंदनवन या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एका निवृत्त महिला डॉक्टरची काही अज्ञात लोकांनी निर्घृणपणे हत्या (Nagpur Crime) केली आहे. या आरोपींनी मृत महिलेला खुर्चीला बांधून तिच्या तोंडावर चिकटपट्टी लावून तिचा गळा कापून तिची हत्या (Nagpur Crime) केली आहे. हि घटना नंदनवन पोलीस (Nandanvan Police) ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास सुरु केला आहे.

 

देवकीबाई जीवनदास बोबडे (Devakibai Jeevandas Bobade) असं हत्या झालेल्या 78 वर्षीय निवृत्त डॉक्टर महिलेचे नाव आहे.
त्या नागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपली मुलगी आणि जावयासोबत राहत होत्या.
शनिवारी रात्री सातच्या सुमारास अज्ञात लोकांनी त्यांची निर्घृणपणे हत्या केली. लुटमारीच्या उद्देशातून अज्ञात आरोपीनं ही हत्या केली असावी.
असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Nagpur Crime)

 

मृत महिलेची मुलगी आणि जावई देखील पेशाने डॉक्टर आहेत. त्यामुळे दोघंही शनिवारी सकाळी आपल्या कामावर गेले होते.
यावेळी मृत देवकीबाई घरी एकट्याच होत्या. याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करत देवकीबाई यांची निर्घृण हत्या (Nagpur Crime) केली आहे.
शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. देवकीबाई यांच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

Web Title : Nagpur Crime | retired doctor woman murder by tied hand and slit throat in nagpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Shreyas Iyer | 89 वर्षांत कुणालाही जमलं नाही ‘तो’ रेकॉर्ड श्रेयसने केला

Gautam Gambhir | आठवड्याभरात गौतम गंभीरला तिसऱ्यांदा मिळाली जीवे मारण्याची धमकी !

Anti Corruption Bureau Ahmednagar | गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News