Nagpur Crime | निवृत्त नायब तहसीलदारानं केला क्रूरतेचा कळस, चक्क श्वानाच्या 2 पिलांना जाळलं

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nagpur Crime | येथे एका निवृत्त नायब तहसीलदाराच्या हातून क्रूरतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे. श्वानाची दोन पिल्ले वारंवार घरात शिरत असल्यामुळे त्यांना काठीने बदडून ठार मारले आणि त्यानंतर कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर ठेऊन जाळले. संपूर्ण घटना शुक्रवारी दुपारनंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. (Nagpur Crime)

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील एका ६५ वर्षीय निवृत्त नायब तहसीलदाराच्या घरात बेवारस श्वानाची दोन पिल्ले वारंवार शिरत होती. त्यामुळे संतप्त झालेल्या वृद्धाने अंदाजे दोन महिने वयाच्या या मुक्या जीवांना काठीने बदडले. त्यांनतर त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकून पेटवून दिले. याप्रकरणी रोशनी गावंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. (Nagpur Crime)

 

अटक केलेल्या आरोपीने श्वानाच्या पिल्लांना जाळलं नसल्याचा खुलासा केला आहे. ही पिल्ल आधीच जखमी झाली होती. त्यांना खरूज होती. त्यांना काठीने मारहाण केली मात्र, जाळले नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले असल्याचे समजते. दरम्यान, या घटनेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मुक्या जनावरांना हे घर कुणाचे आणि त्या घरातील व्यक्ती कोण याची जाण असेल का हे संबंधित निवृत्त नायब तहसीलदारांना का कळलं नाही असा सवालही उपस्थित केला जाऊ लागला आहे.

 

Web Title :- Nagpur Crime | the culmination of cruelty retired deputy tehsildar burnt two puppies of a dog in nagpur

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा