
Nagpur Crime | प्रियकराच्या नादात विवाहीतेनं स्वतःच्या हाताने भरल्या संसाराचा केला ‘सत्यानाश’, तरूणासाठी पतीला दिला ‘दगा’ अन्…
नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nagpur Crime | एका विवाहित महिलेने प्रियकरासाठी आपल्या सुखी संसाराचा विनाश केला आहे. आपल्या बाॅईफ्रेंडशी लग्न करता यावे यासाठी पतीला (Nagpur Crime) सोडून दिलं. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने (Boyfriend refused to marriage) महिलेला धक्का बसला आहे. असा एक विचित्र प्रकार नागपूर येथे घडला. यामुळे आपली फसवणुक झाल्यानंतर पीडितेनं वाठोडा पोलीस ठाण्यात (Vathoda police station) प्रियकराविरोधात एफआयआर (FIR) दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी, 30 वर्षीय फिर्यादी महिला एका इन्शुरन्स कंपनीत काम करत होती. पीडित महिला विवाहित असून त्यांना 5 वर्षांचा 1 मुलगा देखील आहे. पण विमा कंपनीत काम करत असताना अभय सुरेश जैस्वाल (Abhay Suresh Jaiswal) नावाच्या 28 वर्षीय युवकासोबत फिर्यादीची ओळख झाली. काही कालांतराने दोघांच्या ओळखीच रुपांतर प्रेमात झालं. दोघांनीही लग्नाचा विचार केला.
तिने प्रियकाराशी लग्न करता यावं, यासाठी पतीला सोडून दिलं (married woman leave husband for boyfriend). पण ऐनवेळी प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने महिलेची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्यानंतर पीडित विवाहितेनं वाठोडा पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात गुन्हा दाखल (Nagpur Crime) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
दरम्यान, पतीला सोडून दिल्यानंतर पीडित महिलेनं प्रियकर अभयकडे लग्नासाठी विचारणा केली.
त्यावेळी आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
पीडितेनं लग्नासाठी आरोपीवर दबाब टाकूनही तो लग्नासाठी होकार देत नव्हता.
यामुळे पीडित महिलेने वाठोडा पोलीस ठाण्यात (Vathoda Police Station) जाऊन प्रियकाराविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा (Nagpur Crime) दाखल केला आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस (Police) करत आहेत.
Web Title : Nagpur Crime | woman leave husband for boyfriend but he refused to marriage fir lodge in nagpur
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
ICC च्या ‘या’ निर्णयामुळे BCCI ला मोठा दिलासा, 1500 कोटींची होणार बचत
Satara Crime | साताऱ्यातील व्यावसायिकाला 30 लाखाच्या खंडणीसाठी बॉम्बनं उडवून देण्याची परदेशातून धमकी