नागपूरात गुंडाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरमध्ये खुनाच्या (murder) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी सायंकाळी एका गुंडाचा (criminal) दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची खळबजनक घटना घडली आहे. ही घटना कपिलनगरमधील आवळे नगर येथे घडली असून उपराजधानी असलेल्या नागपूरात (nagpur) घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. शैलेश बालाजी देशभ्रतार (वय-34, रा. आवळेनगर) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे.

याप्रकरणी कपिलनगर पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी राकेश मोतीलाल पटेल (वय-32 रा. मानव नगर) याला अटक केली आहे. शैलेश विरुद्ध खून, मारहाण यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. तो परिसरातील नागरिकांना नेहमी त्रास देत होता. राकेशसोबत ओळख असल्याने गुरुवारी दुपारी शैलेश व राकेशने आवळेनगरमध्ये दारु प्यायली. याच दरम्यान शैलेशने राकेशला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्याने राकेशला जिवे मारण्याची धमकी दिली. शैलेश आपल्याला ठार मारेल या भीतीने राकेशने त्याच्या दगडाने ठेचून खून केला. अतिमद्यसेवन केल्याने शैलेश मोकळ्या जागेत झोपला असताना राकेशने हे कृत्य केले.

शैलेशचा खून केल्यानंतर राकेश फरार झाला. घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी राकेशला अटक केली आहे.

तीन दिवसांपूर्वी सराईत गुन्हेगाराचा खून
कपिलनगर परिसरात गुन्हेगार सक्रिय झाल असून त्यांच्याकडून नागरिकांना सतत त्रास दिला जात आहे. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्यास पोलीस काहीच कारवाई करत नाहीत. त्यामुळेच तीन दिवसांपूर्वी तरुणीची छेड काढल्याने तडीपार गुंड दीपक उर्फ गोलू राजपूत याचा खून करण्यात आला. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळेच कपिलनगरमध्ये गुन्हेगारांचे चांगले फावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

You might also like