धक्‍कादायक ! पत्नीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पतीची आत्महत्या

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन – आजच्या उच्चशिक्षित जगात देखील आपण महिला सबलीकरणाच्या गप्पा मारत असलो तरी मात्र बऱ्याच ठिकाणी महिलांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचे आपण बघत आहोत.

मात्र काही ठिकाणी पुरुषांना देखील अशीच वाईट वागणूक मिळत असल्याचे अनेक वेळा पाहायला मिळते. अशाच प्रकारची एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. पत्नी व तिच्या दोन नातेवाईकांनी डॉक्‍टर असलेल्या पतीला शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यामुळे या त्रासाला कंटाळून डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

डॉ. सागर नरेंद्र मोरघडे (३२, पायोनियर वुड्‌स सोसायटी, वानाडोंगरी) असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्‍टरचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसानी गुन्हा दाखल करून घेत या प्रकरणात पत्नी आणि तिच्या दोन नातेवाईकांना पतीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. सागर नरेंद्र मोरघडे हे यशवंतराव चव्हाण अभियांत्रीकी महाविद्यालयात लहान मुलांचे डॉक्टर होते. याच ठिकाणी त्यांचे कोमल नावाच्या मुलीशी प्रेमप्रकरण जुळले. त्यानंतर त्यांनी घरच्यांच्या संमतीने दोन वर्षांपूर्वी लग्न देखील केले. मात्र पती मद्यप्राशन करतो म्हणून डॉ. कोमल काही दिवसांतच माहेरी राहायला गेली.

त्यानंतर तिच्या माहेरचे नातेवाईक आशिष मुकुंदराव तोडकर (३३), मनिषा मुकुंदराव तोडकर (राधानगर, नरसाळा) हे सागरला त्याच्या वागणुकीवर बंधन घालण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर त्यांनी २६ एप्रिल रोजी राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र तपासादरम्यान आशिष मुकुंदराव तोडकर (३३), मनिषा मुकुंदराव तोडकर (राधानगर, नरसाळा) हे दोषी आढळून आल्याने त्या दोघांसह पत्नीवर या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

चिंचेमध्ये लपले आहे तारुण्यपणाचे रहस्य, असा वापर करा

दररोज अंडी खाताय मग हे नक्की वाचा !

आता डॉक्टरांसाठीही सुरु होणार ‘काउंसिलिंग सेंटर’

जाणून घ्या.. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे