धक्कादायक ! प्रियकरासमोरच तरूणीवर केला सामुहिक बलात्कार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरमधील कुहीतील खैरी येथे प्रियकरासमोरच प्रेयसीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी पाच युवक होते त्यातील तीन युवकांनी तरुणीवर बलात्कार केला आहे. याबाबत गुन्हा दाखल केल्यावर १२ तासातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच नरामधम आणि सूत्रधाराला अटक केली असून त्यांना कुही पोलिसांच्या ताब्यात दिले. पंकज विलास कुथे (वय २२) असे सूत्रधाराच्या नाव असून आकाश गुलाबराव लेंडे (वय २६), सुनील ऊर्फ सुमित यशवंत गवळी (वय २७), सूरज बंडूजी मने (वय २२) आणि चंद्रशेखर रवींद्र कडव (वय १९) अशी अटक केलेल्या नराधमांची नावे असून हे सर्वजण कुही येतेच राहणारे आहेत.

पीडितेचे वय १९ वर्षे असून ती बीएच्या शेवटच्या वर्षाला शिकत असू ती नागपूरमध्येच राहते आणि तिचा प्रियकरही नागपूरमध्येच राहायचा. या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. पण प्रियकर कुही तालुक्यातल्या गावात राहायला गेल्यामुळे त्याने १६ मार्चला प्रेसयीच्या मोबाइलवर संपर्क करून तिला कुही येथे भेटायला बोलावले. त्यानंतर ती १७ मार्चला बसने प्रियकराला भेटायला कुही येथे गेली. नंतर दुपारी २ च्या आसपास दोघही गाडीवरून खैरी येथे मंदिरात दर्शनासाठी जात असताना त्यांची गाडी रस्त्यात बंद पडली. यादरम्यान पाच युवक तेथे आले आणि त्यांनी दोघांकडून मोबाइल हिसकावून घेत तरुणाला मारहाण केली.त्यानंतर त्यांच्यातील तिघांनी तरुणीला जवळील झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर ठार मारू, अशी धमकीही दिली. त्यानंतर दोघे घरी गेले. पण दोन दिवसांपूर्वी पीडितेने तिच्या मैत्रिणीला या घटनेबाबत माहिती दिल्यावर मैत्रिणीने तिच्या वडिलांना सांगितले. त्यानंतर पीडित तरुणी, तिची मैत्रिण व मैत्रिणीच्या वडिलांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदत घेत तहसील पोलिसांत तक्रार दिली.

यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्रकरण कुही पोलिसांकडे दिले. या प्रकरणाची दखल घेत अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी आरोपीना अटक करण्याचे आदेश दिले. ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल जिट्टावार, सहाय्यक निरीक्षक जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक गौरखेडे, हेड कॉन्स्टेबल गजेंद्र चौधरी, रमेश भोयर, संतोष पंधरे, बालाजी, सतीश राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी आधी सूत्रधार पंकज व नंतर अन्य चार नराधमांना अटक केली.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
इतकेच नाही तर घटनेच्या दुसऱ्या दिवशी पंकजने पीडित तरुणीशी संपर्क साधत अत्याचाराचा व्हिडिओ काढला असल्याचे सांगितले. तू परत कुही येथे आली नाही, तर व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकीही पंकजने दिली. पीडित तरुणीने पोलिसांना पंकज याचा मोबाइल क्रमांक दिल्यामुळे त्याच्या आधारेच पोलिसांनी शोध घेऊन पंकज व त्याच्या साथीदारांना अटक केले.