धक्कादायक ! मामाच्या मित्रांनीच बिअर पाजून 18 वर्षीय मुलीवर बलात्कार, संपूर्ण जिल्हयात खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका १८ वर्षीय मुलीला बळजबरी दारू पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या आरोपींनी हे कृत्य केले ते पीडितेच्या मामाचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात निखिल सोमकुवर आणि वतन गोमकाले या दोघांना अटक केली असून पोलिसांच्या चौकशीत त्यांनी हि माहिती दिली आहे. पीडितेच्या आईने तिला विचारपूस केली असता हि माहिती समोर आली.

या घटनेविषयी पीडितेने सांगितलेल्या माहितीनुसार ती बी. कॉमच्या पहिल्या वर्षात शिकत असून मुख्य आरोपी निखिल सोमकुंवर हा एका कंपनीत मॅनेजर असून तो आपल्या मामाचा मित्र असल्याची माहिती पीडितेने दिली. आरोपीने सुरुवातीला फेसबुकच्या माध्यमातून पीडितेशी मैत्री केली. त्यानंतर एक दिवस आपल्या घरी येऊन आपली आई घरी नसताना त्याने माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने अनेकदा बलात्कार केला.

दरम्यान, या घटनेतील दुसऱ्या आरोपीविषयी बोलताना तिने सांगितले कि, १९ जुलै रोजी निखिल त्याचा मित्र वतन गोमकाले याला घेऊन घरी आला. त्यावेळी त्यांनी बिअरची बाटली देखील सोबत आणली होती. त्यानंतर त्यांनी तिला बळजबरी ती बिअर पाजली आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर हि घटना कुणालाही सांगितल्यास भावाला मारण्याची तिला धमकी दिली.

त्यामुळे तिने कुणालाही हा प्रकार सांगितला नाही. मात्र नंतर तिच्या आईने विचारले असता तिने आपल्याबरोबर घडलेला सर्व प्रकार सांगितला. ३१ जुलै रोजी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या आरोपींना बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like