मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात लोकसंख्येपेक्षा आधार नोंदणीच जास्त

नागपूर पोलीसनामा

नागपूर जिल्ह्यात आधार कार्डसंबंधी एक धक्कादायक प्रकार, माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीतून समोर आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एकूण आधार कार्ड नोंदणीची माहिती मागविली होती. मात्र, या माहितीचा आणि जिल्ह्याच्या लोकसंख्येचा ताळमेळ लागत नाही. कारण एकूण आधार कार्ड नोंदणी ही नागपूरच्या लोकसंख्येपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f33d34e6-a50e-11e8-8d05-53875127695b’]

२०११ च्या जनगणनेनुसार नागपुर जिल्ह्यातील नागपूूर तालुक्याची लोकसंख्या २४ लाख ५ हजार ४२१, नागपूर ग्रामीण २ लाख ६ हजार ३१८, मौदा १ लाख २५ हजार १४७, हिंगणा २ लाख ३४ हजार ५३० तर कामठी तालुक्याची लोकसंख्या १ लाख १८ हजार १३९ आहे. तर तालुकानिहाय आधार नोंदणी नागपूर ११ लाख १७ हजार २८३, नागपूर ग्रामीण ३ लाख ४९ हजार १४०, हिंगणा १ लाख ४८ हजार ५१४, कामठी १ लाख ८३ हजार ३४०, मौदा तालुक्यात आधार नोंदणी  ११ लाख ५६ हजार ७८३ आहे. म्हणजेच मूळ लोकसंख्येहून तब्बल १० लाख १५ हजार ७६७ अधिक नागरिकांनी मौदा तालुक्यात आधार नोंद केली असल्याची माहिती माहितीच्या अधिकारात पुढे आली आहे. ही आकडेवारी धक्कादायक आहे. जिल्ह्यात ९८ टक्क्यांहून अधिक नागरिकांची ‘आधार कार्ड नोंदणी झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.