Nagpur News : कारागृहात कैद्यांना अंमली पदार्थ पुरविणारा कर्मचारी गजाआड, जेल रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर मध्यवर्ती कारागृहात गेल्या अनेक दिवसांपासून कैद्यांना अंमली पदार्थ, ड्रग्स, अफिम, गांजा आणि दारु देखील पोहोचवल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बुधवारी (दि.20) एका तुरुंग रक्षकाची अंगझडती घेताना चक्क ड्रग्स सापडले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी धंतोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश मधुकर सोळंकी (वय-28 रा. सहकारनगर) असे अटक करण्यात आलेल्या तुरुंग कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमारास कर्मचाऱ्यांना ड्युटीाठी कारागृहात घेण्यात आले. त्यांच्या वागणूकीवर तुरुंग अधिक्षकांना संशय आला. त्यामुळे त्यांची झडती घेण्यात आली. त्यापैकी मंगेश सोळंकी हा झडती घेताना घाबरला. त्याच्यावर जास्त संशय बळावल्याने तुरुंग अधिक्षकांच्या उपस्थितीत झडती घेण्यात आली.

मंगेशच्या पायाताली मोज्यात कुठलीतरी पुडा आढळून आली. त्यामध्ये पांढऱ्या रंगाचा पदार्थ होता. त्याची तपासणी केली असता कैद्यांच्या मागणीवरुन ड्रग्स असल्याचे अधिक्षकांच्या लक्षात आले. पोलीस अधिक्षकांनी तात्काळ मंगेशची प्राथमीक चौकशी सुरु केली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने धंतोली पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी आरोपी मंगेशला अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.