नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यु, महापौर व आयुक्तांच्या बैठकीत निर्णय !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोनाबाधितांचा आकडा पाहता स्थानिक प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. शहरात आता 2 दिवसांच्या जनता कर्फ्युची घोषणा करण्यात आली आहे. महापौर संदीप जोशी यांनी येत्या शनिवार-रविवारी आणि पुढील आठवड्यात जनता कर्फ्युचं आवाहन नागरिकांना केलं आहे.

नागपूर महागरपालिका आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तरित्या हा निर्णय जाहीर केला आहे. या 2 दिवसांच्या कर्फ्युच्या काळात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहेत. किराणा, भाजीपाला आणि डेअरी तसंच जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहणार आहेत. शनिवार आणि रविवारची परिस्थिती बघून भविष्यातील इतर निर्णय घेण्यात येतील असं महापालिका आयुक्तांनी सांगितलं.